

IPL 2022: सध्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा (IPL 2022) १५ वा हंगाम सुरू आहे. यंदाच्या हंगामाकडे क्रिडाप्रेमींचं विशेष लक्ष आहे. कारण, यावर्षी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Supergiants) हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये सहभागी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे स्पर्धेत गुजरात टायटन्सने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. (Brad Hogg Says Hardik Pandya Is likely To Replace Rohit Sharma For Team India)
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळणारा हा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. स्पर्धेत हार्दिकची एकूण कामगिरी बघता तो भारतीय संघाचा आगामी कर्णधार (Team India Captain) बनू शकतो. अशी भविष्यवाणी एका माजी खेळाडूने केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्ववात आयपीएलमध्ये गुजरातने ७ पैकी ६ सामने जिंकले आहे. गुजरातच्या यशात कर्णधार हार्दिकचा मोठा वाटा आहे.
हार्दिक घेणार रोहितची जागा?
दुसरीकडे, यंदाच्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सची कामगिरी सर्वात खराब झाली आहे.. मुंबईने आयपीएलच्या इतिहासात सलग ७ सामने गमविण्याचा लाजीरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. मुंबईच्या (Mumbai Indians) खराब स्थितीनंतर रोहितच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत येत्या दोन हार्दिक पांड्या रोहित शर्माची जागा घेईल, असं भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर ब्रॅड हॉगने केलं आहे.
'हार्दिक IPL 2022 चा यशस्वी कर्णधार'
ब्रॅड हॉग (Brad Hogg) आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की, 'गुजरात टायटन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. मला वाटते की तो आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे. हार्दिकमध्ये कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता आहे. कुठल्याही प्रसंगात तो दबावात दिसत नाही. मैदानातही आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करत असतो. तो पुढे भारतीय संघाचं चांगलं करू शकतो असं मला वाटतं.
दरम्यान आयपीएल २०२१ नंतर हार्दिक पांड्या दुखापतीनंतर भारतीय संघातून बाहेर होता. त्याचा खराब फॉर्म आणि दुखापत यामुळे त्याला संधी मिळत नव्हती. मात्र, आयपीएल २०२२ मध्ये तो फुल्ल फॉर्ममध्ये दिसला. हार्दिक पांड्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.