Rohit Sharma: दुबमईमध्ये ५ स्पिनर्सचं काय काम? बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माने टीम इंडियांचं मोठं कोडं सोडवलं

IND vs BAN Cricket Match: टीम इंडियाच्या संघात 5 स्पिनर असल्याचं गणित लोकांना अजून समजलेलं नाही. अशातच कर्णधार रोहित शर्माने टीमविषयी मोठं विधान केलं आहे.
five spinners dubai
five spinners dubaisaam tv
Published On

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. या सामन्याआधी प्लेइंग ११ मध्ये कोणते खेळाडू खेळणार, हे टीम इंडियासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे. विशेषत: टीम इंडियाच्या संघात 5 स्पिनर असल्याचं गणित लोकांना अजून समजलेलं नाही. अशातच कर्णधार रोहित शर्माने टीमविषयी मोठं विधान केलं आहे.

five spinners dubai
Rohit Sharma Health Update: रोहित शर्माची तब्येत बिघडली? प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये अस्वस्थ दिसला, बांगलादेशविरुद्ध खेळणार की नाही?

टीम सिलेक्शनवर रोहित काय म्हणाला?

भारताचा कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये ५ स्पिनर्सची निवड करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. त्यापैकी तीन अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांना आपल्या संघात खूप महत्त्व आहे.

वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोन उत्तम फिरकी गोलंदाज आहेत. तर फिरकी विभागात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे सर्व सक्षम फलंदाज आहेत. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्या रूपात टीमकडे वेगवान गोलंदाजीचे तीन पर्याय आहेत तर हार्दिक पांड्या हा एकमेव वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे.

five spinners dubai
IND VS PAK : भारताविरोधात भिडण्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का, हुकमी एक्का स्पर्धेबाहेर

टीममध्ये अधिक स्पिनर गोलंदाजांच्या उपस्थितीबद्दल विचारलं असता रोहित म्हणाला, 'दोनच स्पिनर आहेत, उर्वरित ऑल राऊंडर आहेत. ते फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकतात. आम्ही आमच्या ताकदीनुसार खेळतो. हे तीन्ही ऑल राऊंडर खेळाडू टीमला एक वेगळा परिणाम देऊ शकतात. आम्हाला एकाऐवजी दोन कौशल्य असलेलं खेळाडू हवे होते.

रोहित पुढे म्हणाला की, सर्व आयसीसी टूर्नामेंट्सप्रमाणे ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी योग्य पद्धतीने कराव्या लागणार आहेत.

five spinners dubai
IND vs BAN : हर्षित राणा बाहेरच, ३ स्पिनरसोबत उतरणार टीम इंडिया, पाहा प्लेईंग ११

बांगलादेशाविरूद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग ११

भारताची संभाव्य प्लेईंग ११ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जड़ेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com