FIFA World Cup 2026 : ४८ संघ, १६ शहरं आणि १०४ सामने...कोण ठरणार विश्वविजेता? चक्रावून टाकणारा अंदाज

२०२६ फिफा वर्ल्ड कप हा केवळ फुटबॉल स्पर्धा नसून एआय, इंटरनेट आणि जागतिक अर्थव्यवस्थेची मोठी कसोटी ठरणार आहे. फ्रान्स आणि स्पेन हे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असून एआय मॉडेल्सचे अंदाजही चर्चेत आहेत.
FIFA World Cup 2026 AI analysis
FIFA World Cup 2026 AI analysis
Published On

FIFA World Cup 2026 AI analysis : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्याव्दारे संयुक्तपणे आयोजित केला जात असलेला २०२६ फिफा वर्ल्ड कप हा यंदा केवळ एक क्रीडा सोहळा ठरणार नाही, तर इंटरनेट त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्था या दोघांसमोर डिजिटल आणि आर्थिक अशा दोन्ही पातळीवर यशस्वी होण्यासाठीची एक महाकसोटीची परिक्षा राहणार आहे. या वर्षाच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे अधिकृत प्रायोजक असलेल्या बँक ऑफ अमेरिकाने या स्पर्धेला एक ऐतिहासिक “मेगा-इव्हेंट” संबोधलेले आहे. ही स्पर्धा जगातील फुटबॉल पाहण्याची पद्धत, डेटा तसेच मीडिया यांचा वापर करण्याच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे, असा अंदाज बँक ऑफ अमेरिकाने व्यक्त केला आहे.

पुवीचे सर्व विक्रम मोडीत काढणारी डिजीटल पातळीवरील ताण चाचणी परिक्षा

२०२६ च्या या स्पर्धेत ४८ संघ सहभागी होणार असून तब्बल १६ शहरांमध्ये एकूण १०४ सामने खेळवले जातील. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेची प्रेक्षकसंख्या जगभरात अंदाजे ६ अब्ज इतकी राहण्याचा अंदाज आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या जागतिक संशोधन विभागातील विश्लेषकांच्या मते, या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळी एका ठराविक वेळेत जागतिक इंटरनेट ट्रॅफिकचा ७ टक्के हिस्सा वापरला जाऊ शकतो. या स्पर्धेचा थेट डेटा ९० पेटाबाइट्स पेक्षा अधिक राहणार असून तो २०२२ मध्ये कतारला झालेल्या वर्ल्डकपपेक्षा ४५ पटीने अधिक असणार आहे. जेव्हा यामध्ये एआय-आधारित सिम्युलेशन्स, सोशल मीडियावरील होणारी चर्चा आणि चाहत्यांच्या डिजीटल कंटेटचा समावेश केला जाईल, तेव्हा एकूण डेटा निर्मिती दोन एक्झाबाइट्स (Exabytes) पर्यंत पोहोचू शकते. डेटाचे हे प्रचंड प्रमाण केवळ ३९ दिवसांत तयार होणार आहे आणि त्याची तुलना तब्बल ४५,००० वर्ष इतक्या कालावधीत फोर के व्हिडिओ पाहण्याइतका प्रचंड डेटाशी होऊ शकते.

सामन्यांचे थेट प्रसारण करणाऱ्या कंपन्या त्याचबरोबर तंत्रज्ञान कंपन्या प्रत्येक मोठ्या सामन्यासाठी एकावेळी तब्बल ५ कोटी प्रेक्षकांना हाताळण्यासाठी २०० टेराबाइट्सपेक्षा जास्त बँडविड्थ राखून ठेवण्याची तयारी करत आहेत. मोबाईल आणि स्ट्रीमिंग नेटवर्क्सवर यापूर्वी कधीही न आलेला प्रचंड ताण या सामन्यांच्यावेळी येणार आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे. यंदाच्या या स्पर्धेचे दुप्पट प्रमाणात प्रक्षेपण केले जाणार असल्याने हा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), एज कॉम्प्युटिंग, फाईव्हजी आणि रिअल-टाइम डेटा पायाभूत सुविधा या सर्व घटकांसाठी जगभरातील विविध खंडात एक 'लाईव्ह स्ट्रेस टेस्ट' अर्थात चालतीबोलती ताणचाचणी ठरणार आहे. यामुळे स्ट्रीमिंग अर्थव्यवस्था आणि नेटवर्कच्या लवचिकता या घटकांच्या क्षमतेची कसोटीसुध्दा पणाला लागणार आहे.

FIFA World Cup 2026 AI analysis
Breaking : कॅबिनेट मंत्री सुधाकर यांचे निधन; फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज ठरली अपयशी, राजकीय वर्तुळावर शोककळा

४१ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीवर आधारित संकल्पना

मैदानावर चालणाऱ्या खेळाच्या थरारामागे गुंतवणुकीचे एक शक्तिशाली गणित दडलेले आहे. बँक ऑफ अमेरिकाच्या संशोधनानुसार, २०२६ ची ही जागतिक स्पर्धा ही साधारणपणे ४१ अब्ज डॉलर्सची गुंतवणुकीची एक भव्यदिव्य अशी संकल्पना राहणार आहे. यामध्ये फिफाशी संबंधित असलेल्या स्पोर्ट्स-टेक मंचांपासून ते एअरलाईन्स, हॉटेल्स, ब्रॉडकास्टर्स आणि ऑनलाईन सट्टेबाजी ऑपरेटरपर्यंतच्या अनेक घटकांचा समावेश आहे. फिफा आणि जागतिक व्यापार संघटना यांच्या संयुक्त अभ्यासानुसार, या स्पर्धेतून जागतिक उत्पादनात सुमारे ८०.१ अब्ज डॉलर्सची निर्मिती होऊ शकते. तसेच, यामुळे जागतिक जीडीपीमध्ये ४०.९ अब्ज डॉलर्सची भर पडेल आणि जगभरात साधारणपणे ८,२४,००० नोकऱ्यांना सहाय्य मिळणार आहे.

केवळ क्रीडा पर्यटनातून २०२५ मध्ये ६७२ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाला असून, २०३० पर्यंत जागतिक क्रीडा उद्योगाच्या एकूण महसुलात क्रीडा पर्यटनाचा वाटा ४१ टक्के राहील, असा अंदाज आहे. वर्ल्ड कपमुळे प्रवास, निवासव्यवस्था (हॉटेल्स), रेस्टॉरंट्स, स्पोर्ट्सवेअर आणि डिजिटल सहभाग आदी घटकांची मागणी किती मोठ्या प्रमाणावर वाढते, हे यातून स्पष्ट होते. 'बँक ऑफ अमेरिका' आणि इतर संस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेकडे अमेरिकी शेअरबाजार तसेच गुंतवणूकदार एक रणनिती (प्लेबुक) म्हणून पाहत आहे. स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स, उपकरण निर्मात्या कंपन्या, पेमेंट गेटवे आणि सोशल मीडिया नेटवर्क्स यापैकी कोणत्या क्षेत्रांना या स्पर्धेदरम्यान वाढणाऱ्या डिजीटल ट्रॅफिकचा आणि चाहत्यांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक कमाईचा सर्वाधिक फायदा होईल, हे या रणनितीतून शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

फ्रान्स विरुद्ध स्पेन: मानवी तर्क आणि एआयचा अंदाज

मैदानावरील प्रत्यक्ष कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, बँक ऑफ अमेरिकेच्या ग्लोबल रिसर्च रिपोर्टने फ्रान्सला २०२६ चा करंडकाचे प्रबळ दावेदार मानले आहे. फ्रान्स संघाचा आक्रमण फळीतील दिग्गज खेळाडू किलियन एमबाप्पे हा 'गोल्डन बूट' जिंकेल आणि अंतिम सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आला आहे. ६५ विश्लेषकांच्या एका अंतर्गत सर्वेक्षणात, सुमारे ४० टक्के व्यक्तींनी फ्रान्सलाच चॅम्पियन म्हणून निवडले आहे, तर साधारणपणे २५ टक्के विश्लेषकांच्या मते फ्रान्स आणि स्पेन या दोन संघांदरम्यान अंतिम सामना होण्याची अपेक्षा आहे. यावरून दोन्ही संघांचा सध्या असलेला दरारा आणि वर्चस्व पूर्णपणे दिसून येते.

मात्र, जेव्हा बँक ऑफ अमेरिका एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) मॉडेल्सचा आधार घेते, तेव्हा चित्र बदललेले दिसते. अनेक एआय-आधारित सिम्युलेशन्स मॉडेल्स स्पेनला विजयाची समान संधी देतात, तर काही निष्कर्षांमध्ये स्पेनला विजेता आणि फ्रान्सला उपविजेता दर्शवण्यात आलेले आहे. ही तफावत हे अधोरेखित करते की, एआय आता केवळ बाजूला राहून मदत करणारे साधन उरलेले नाही, तर या स्पर्धेतील एक सक्रिय नियंत्रण स्तर ("कंट्रोल लेयर") सुध्दा बनले आहे. या स्पर्धेतील प्रत्येक संघाला फिफाच्या 'फुटबॉल एआय प्रो' (Football AI Pro) या मंचाचा वापर करता येईल. हा तांत्रिक मंच रणनीती, प्रतिस्पर्धी खेळाडूला वेगाने घेरण्याची (प्रेसिंग) आणि खेळात वेगवान बदल (ट्रान्झिशन) अधिक अचूक बनवण्यासाठी रिअल-टाइममध्ये कोट्यवधी डेटा पॉइंट्स आणि २००० हून अधिक सामन्यांच्या कामगिरीच्या निकषांचे विश्लेषण करण्यास मदत करतो.

या सर्व पार्श्वभूमीवर, २०२६ चा वर्ल्ड कप हा केवळ आता एक फुटबॉलचा सामना उरलेला नाही, तर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), पैसा आणि पायाभूत सुविधा यांचा इतक्या व्यापक स्तरावर एकमेकांशी कसा मेळ घालता येऊ शकतो, याचा एक जागतिक प्रयोग राहणार आहे आणि चाहते गुणफलवावरील निकालाकडे जेवढ्या उत्सुकतेने चाहते पाहतील, तेवढ्याच बारकाईने गुंतवणूकदार आणि नेटवर्क इंजिनीयर्ससुद्धा या जागतिक प्रयोगाकडे लक्ष ठेवून असणार आहेत.

FIFA World Cup 2026 AI analysis
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो..₹१५०० बंद झाले का? योजनेत तुमचं नाव आहे का? एका क्लिकवर असं तपासा स्टेट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com