Fifa World Cup Qualifier: फुटबॉलमध्येही भारताचा डंका; फिफा वर्ल्डकपच्या क्लीफायर सामन्यात विजयी 'गोल'

Fifa World cup Qualifier : सुनील छत्री यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय फुटबॉल संघाने क्लीफायर फेरीच्या सामन्यात मोठा विजय मिळलाय.
Fifa World Cup Qualifier
Fifa World Cup QualifierTwitter
Published On

Fifa World Cup Qualifier India Beat kuwait:

देशात सध्या क्रिकेट वर्ल्डकपची धूम आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्या या धूमबरोबर फुटबॉलच्या मैदानात भारतीय संघाने विजयचा धुराळा उडवलाय. सुनील छत्री यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय फुटबॉल संघाने क्लीफायर फेरीच्या सामन्यात मोठा विजय मिळलाय. भारतीय फुटबॉल संघाने कुवैतच्या फुटबॉल संघाला १-० ने पराभूत केलं आहे. हा सामना जबेर अल अहमद इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये झाला. भारताचा पुढील सामना आता कतरच्या संघाशी होणार आहे. (Latest News)

भारत आणि कुवैतमध्ये झालेल्या या सामन्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. दोन्ही संघ गोल करण्यासाठी धडपडत होते. खेळाच्या पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघाला एकही गोल करता आला नव्हता. दुसऱ्या हाफच्या शेवटच्या वेळी भारतीय फुटबॉल खेळाडू मनवीर सिंह फुटबॉल प्रतिस्पर्धांच्या गोल पोस्टमध्ये ढकलण्यात यशस्वी झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याच्या या शानदार गोलमुळे भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवली आणि विजय निश्चित केला. दरम्यान फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या क्लीफायर्सच्या दुसऱ्या फेरीत भारतीय फुटबॉल संघ ग्रुप-अ चा भाग आहे. यात भारतीय संघाचा सामना कुवैतशिवाय अफगाणिस्तानच्या संघाशी होणार आहे.

वर्ष २०२७ मध्ये होणाऱ्या एफसी आशियाई कपसाठी हा क्लीफायर फेरी खूप महत्त्वाची आहे. कारण या क्लीफायर फेरीलमधील विजयाने प्रत्येक ग्रुप मधील दोन संघ एफसी आशियाई कपमध्ये आपलं क्वॉलिफिकेशन निश्चित करतील.

ग्रुप-अ मध्ये असलेल्या संघाच्या स्थितीनुसार भारतीय फुटबॉल संघाची स्थिती चांगली असून भारत या ग्रुपच्या पाईंट्स टेबलच्या दुसऱ्या स्थानी आहे. कुवैतला पराभूत केल्यानंतर भारतीय फुटबॉल संघाने दुसरं स्थान पटकावलं आहे. भारतीय फुटबॉल संघाकडे सध्या तीन पाईंट्स आहेत. तर या पाईंट्स टेबलच्या पहिल्या स्थानी कतार देशाचा संघ आहे.

कतारच्या संघाने अफगाणिस्तानच्या संघाल पराभूत केलं आहे. कतारच्या फुटबॉल संघाने ८-१ ने गोल करत अफगाणिस्तानच्या संघाला पराभूत केलं. आता कतारच्या संघाशी भारतीय फुटबॉल संघ दोन हात करतील. या दोन्ही संघाचा फुटबॉल सामना २१ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअमवर होणार आहे. त्यानंतर ग्रुप- अमधील संघ आपला शेवटचा सामना अफगाणिस्तानच्या विरुद्धात खेळतील.

Fifa World Cup Qualifier
World Cup Video: पॅट कमिन्सने घेतला वर्ल्डकपमधला सर्वात कठीण झेल? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com