World Cup Video: पॅट कमिन्सने घेतला वर्ल्डकपमधला सर्वात कठीण झेल? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ODI World Cup 2023: वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं.
Pat Cummins
Pat CumminsCatch
Published On

Pat Cummins video went viral :

दक्षिण आफ्रिकेचा संघ परत एका वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पराभूत झालीय. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने तीन विकेट राखत दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकपच्या बाहेरचा रस्ता दाखवला. आयसीसी २०२३ वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियानं जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. (Latest News)

याचं उत्तम उदाहरण म्हणजे पॅट कॅमिन्सने क्विंटन डि कॉकचा घेतलेला झेल. या झेल आतापर्यंतच्या सामन्यामधील सर्वात कठीण झेल होता. कमिन्सने झेल टेपला त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पॅट कमिन्सने क्विंटन डी कॉकला बाद करण्यासाठी एक शानदार बॅकवर्ड रनिंग झेल घेतला.

पॅट कमिन्सने सर्वात कठीण झेल घेतला?

पॅट कमिन्सच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड सहावे षटक टाकत होता. तर फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज क्विंटन डी कॉक क्रिजवर होता. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्स मिडऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षण करत होता.

डी कॉकला मोठा फटका मारायचा होता. या सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर डी कॉकने एक उंच फटका मारत चेंडू सीमेरेषेबाहेर टाकण्याचा प्रयत्न करत होता. परंतु उंच गेलेला चेंडू सीमेरेषेपर्यंत पोहोचू शकला नाही. तो उंच गेलेला चेंडू मिडऑनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या कमिन्सच्या हातात स्थिरावला.

मागे धावत जात पॅट कमिन्सने हा झेल टिपला. मागे धावत असताना कमिन्सने उंच हवेत गेलेल्या चेंडूवरील नजर हटू दिली नाही. खाली पडूनही त्याने आपली नजर चेंडूवर ठेवली आणि अप्रतिम असा झेल घेतला. आणि क्विंटन डी कॉक १४ चेंडूत केवळ ३ धावा करून बाद झाला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pat Cummins
Aus vs SA 2023 Semi Final: मिलरच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेची २१२ धावांपर्यंत मजल; फायनलमध्ये कोण जाणार?

डेव्हिड मिलरच्या (१०१ धावा) शतकी खेळीनंतर आफ्रिकेने २१२ धावा केल्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावत पूर्ण केलं. दरम्यान नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. पण डेव्हिड मिलरने हेन्रिक क्लासेनसोबत पाचव्या विकेटसाठी ९५ धावांची आणि गेराल्ड कोएत्झीसोबत सातव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली होती.

Pat Cummins
AUS vs SA: विश्वचषकात कांगारुंची दादागिरी सिद्ध, दक्षिण आफिक्रेवर पुन्हा 'चोकर्स'चा शिक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com