Joe Root Record: लॉर्ड्सच्या मैदानावर जो रुटचा धमाका! शतक झळकावताच विराट, रोहितलाही सोडलं मागे

Joe Root Record News In Marathi: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावत अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.
Joe Root Record: लॉर्ड्सच्या मैदानावर जो रुटचा धमाका! शतक झळकावताच विराट, रोहितलाही सोडलं मागे
joe roottwitter
Published On

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याची बॅट चांगलीच तळपतेय. फॅब ४ फलंदाजांमध्ये सर्वात पिछाडीवर असताना रूटने गेल्या काही वर्षांत दमदार कमबॅक करत उर्वरित तिनही फलंदाजांना मागे सोडलं आहे.

लॉर्ड्समध्ये श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३३ वे शतक झळकावले आहे. त्याने १४३ धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

कसोटीत ठोकलं ३३ वं शतक

कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत शतक न झळकावता त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (२०२३-२५) स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं होतं. आता श्रीलंकेविरुद्धचा सामन्यात त्याने १६२ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतलं ३३ वं शतक ठरलं आहे. कौतुकास्पद बाब अशी की, गेल्या ११ सामन्यात त्याने ३ शतकं झळकावली आहेत.

Joe Root Record: लॉर्ड्सच्या मैदानावर जो रुटचा धमाका! शतक झळकावताच विराट, रोहितलाही सोडलं मागे
Joe Root Record: जे विराट,रोहितलाही नाही जमलं, ते रुटने करुन दाखवलं! या मोठ्या रेकॉर्डमध्ये बनला नंबर 1

लॉर्डसच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी शतकं

जो रूटला (Joe root) लॉर्ड्सच्या एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. यापूर्वी मायकल वॉन आणि ग्राहम गुच यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळताना प्रत्येकी ६ शतकं झळकावली होती. आता रुटनेही ६ शतकं झळकावली आहेत. तर केविन पीटरसन आणि अँड्र्यू स्ट्रॉस यांच्या नावे प्रत्येकी ५ शतकं झळकावण्याची नोंद आहे.

Joe Root Record: लॉर्ड्सच्या मैदानावर जो रुटचा धमाका! शतक झळकावताच विराट, रोहितलाही सोडलं मागे
Joe Root Record: जो रुटचा मोठा कारनामा! या रेकॉर्डमध्ये सचिनला मागे सोडत बनला नंबर १

या रेकॉर्डमध्ये पोहोचला १० व्या स्थानी

जो रूटच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १० व्या स्थानी पोहोचला आहे. हे रूटच्या कारकिर्दीतील ३३ वं शतक ठरलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आपल्या कारकीर्दीत ५१ शतकं झळकावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com