Joe Root Record: जे विराट,रोहितलाही नाही जमलं, ते रुटने करुन दाखवलं! या मोठ्या रेकॉर्डमध्ये बनला नंबर 1

Joe Root Record, SL vs ENG Test Sereis: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील मोठ्या रेकॉर्डमध्ये यशस्वी जयस्वालला मागे सोडलं आहे.
Joe Root Record: जो रुट बनला नंबर 1! मोठ्या रेकॉर्डमध्ये स्टार भारतीय फलंदाजाला सोडलं मागे
joe roottwitter
Published On

सध्या श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटला चांगली सुरुवात मिळाली होती.

मात्र त्याला या खेळीचं रुपांतर मोठ्या खेळीत करता आलं नाही. तो ४२ धावा करत माघारी परतला. यादरम्यान त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालला मागे सोडलं आहे.

Joe Root Record: जो रुट बनला नंबर 1! मोठ्या रेकॉर्डमध्ये स्टार भारतीय फलंदाजाला सोडलं मागे
Team India News: टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार खेळाडूचं कमबॅक होणं कठीण; जय शहांनी दिली मोठी अपडेट

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव २३६ धावांवर आटोपला. फलंदाजीत फ्लॉप झाल्यानंतर गोलंदाजांनी श्रीलंकेला दमदार कमबॅक करुन दिलं.

गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीमुळे इंग्लंडचे फलंदाज सुरुवातीला बॅकफूटवर होते. मात्र त्यानंतर हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथने शानदार अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला कमबॅक करुन दिलं. दरम्यान रुट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत (२०२३-२५) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान गाठलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत इंग्लंडचा संघ पिछाडीवर असला तरीदेखील, जो रुट मात्र आघाडीवर आहे. या स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये त्याने १०६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ४८.४० इतकी राहिली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील या हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालच्या नावे होता. जयस्वालने ९ कसोटी सामन्यांमध्ये १०२८ धावा केल्या आहेत.

या धावा त्याने ६८.५३ च्या सरासरीने केल्या आहेत. यादरम्यान त्याला ३ शतक आणि ४ अर्धशतक झळकावता आली आहेत. सर्वाधिक धावांच्या रेकॉर्डमध्ये जयस्वालला मागे सोडण्यासाठी रुटला अवघ्या ६ धावा करायच्या होत्या. दरम्यान त्याने ४२ धावांची खेळी करत मागे सोडलं आहे.

Joe Root Record: जो रुट बनला नंबर 1! मोठ्या रेकॉर्डमध्ये स्टार भारतीय फलंदाजाला सोडलं मागे
Team India News: या २ दिग्गज भारतीयांची कारकिर्द जवळजवळ संपली! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही

भारतीय संघ तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाणार?

भारतीय संघाने आतापर्यंत २ वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान भारतीय संघाकडे तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. सध्या भारतीय संघ या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com