Ben Stokes On Loss: 'पराभवामुळे आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो ..' हातचा सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार भावुक..

Eng vs Aus Ashes 2023: हा सामना झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मोठे वक्तव्य केले आहे.
ben stokes
ben stokes saam tv
Published On: 

Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना एजबस्टनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी २८१ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने झुंजार खेळी केली आणि संघाला २ गडी राखून विजय मिळवून दिला. तर इंग्लंडच्या बॅजबॉलची हवा काढणारा उस्मान ख्वाजा या सामन्याचा हिरो ठरला. दरम्यान हा सामना झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मोठे वक्तव्य केले आहे.

ben stokes
Ashes 2023: इंग्लंडला दुहेरी धक्का; विजेत्या ऑस्ट्रेलियावरही ICC ने केली मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

या पराभवानंतर बोलताना बेन स्टोक्स म्हणाला की, 'आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. आम्ही नेहमीच जिंकण्यासाठी खेळतो. मात्र या पराभवानंतर खेळाडूंच्या मनोबलाचं खच्चीकरण झालं आहे. विशेषतः रोबो आणि ब्रॉडी( ऑली रॉबिनसन आणि स्टुअर्ट ब्रॉड) ज्यांनी हा सामना जवळजवळ फिरवलाच होता.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'हा मानसिक धक्का असूच शकत नाही. आम्ही हा सामना हरलो. पण गेल्या काही अॅशेस मालिका पाहिल्या, त्याच्या तुलनेत आम्ही जो काही खेळ केला आहे ते दाखवून देतं की आम्ही काय करू शकतो. पराभूत होणं निराशाजनक आहे. मात्र पहिल्या चेंडूपासून आम्ही हल्ला चढवला होता. यावरून स्पष्ट होतं की, आम्ही कमबॅक करण्यासाठी सक्षम आहोत. आमच्याकडे ४ सामने शिल्लक आहेत. आता आम्ही उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत.' (Latest sports updates in marathi)

ben stokes
Ashes 2023: इंग्लिश कर्णधाराचं ऑस्ट्रेलियाला ओपन चॅलेंज! सामान्याच्या २ दिवसापूर्वीच जाहीर केली प्लेइंग ११

ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय..

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३९३ धावा करत डाव घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३८६ धावांचा डोंगर उभारला होता. दुसऱ्या डावात आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला २७३ धावा करता आल्या होत्या. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला २८१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून विजय मिळवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.