ENG VS AUS Ashes 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा धुव्वा उडवत जेतेपदाला गवसणी घातली. आता कसोटी क्रिकेटमधील महायुध्द, म्हणजेच ॲशेस मालिकेला प्रारंभ होणार आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणाऱ्या मालिकेतील पहिला सामना १६ जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने २ दिवसांपूर्वीच आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे
एजबस्टनच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंड संघात दोन प्रमुख गोलंदाजांच कमबॅक झालं आहे. जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिनसन या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
ॲशेस मालिकेसाठी निवृत्तीतून परतलेला फिरकी गोलंदाज मोईन अलीला देखील संधी दिली गेली आहे. या संघात त्याच खेळाडूंना प्राधान्य दिलं गेलं आहे, जे आयर्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून आले होते.
इंग्लंडचा संघ ७ प्रमुख फलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. तर आठवा फलंदाज म्हणून मोईन अलीला संघात स्थान दिलं गेलं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसन, ओली रॉबिनसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला संघात स्थान दिलं गेलं आहे. तर कर्णधार बेन स्टोक्स देखील गोलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)
फिरकी गोलंदाजीची जबाबदारी मोईन अलीवर असणार आहे. तर जो रूट देखील त्याला साथ देताना दिसून येऊ शकतो. एजबस्टनची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे मोईन अली आणि जो रूटला फारशी गोलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही.
अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११:
बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिनसन आणि जेम्स एंडरसन.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.