PBKS VS DC Match Result: लिविंगस्टनची खेळी व्यर्थ! दिल्लीच्या विजयाने या ४ संघांना होणार फायदा; पाहा काय आहे प्लेऑफचं समीकरण

IPL 2023 Points Table: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६४ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला
pbks vs dc
pbks vs dctwitter

IPL 2023 Playoffs: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६४ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावांचा डोंगर उभारला होता.

या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाला १९८ धावा करता आल्या आहेत. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने १५ धावांनी विजय मिळवला आहे. यासह पंजाब किंग्ज संघाची प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आणखी कमी झाली आहे.

pbks vs dc
IPL Points Table: CSK अन् MI ची चिंता वाढली! सोप्या भाषेत समजून घ्या प्लेऑफचं समीकरण

दिल्लीने उभारला २१३ धावांचा डोंगर..

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने आक्रमक सुरुवात करून देत ३१ चेंडूंचा सामना करत ४६ धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉने ३८ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली. शेवटी रायले रुसोने वादळी खेळी केली. त्याने ३८ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने ८२ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटक अखेर २ गडी बाद २१३ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

pbks vs dc
IPL 2023 Playoffs: LSG विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई स्पर्धेतून बाहेर? तर या २ संघांची लागली लॉटरी; पाहा समीकरण

लिविंगस्टनची खेळी व्यर्थ..

या सामन्यात पंजाबला विजयासाठी २१३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून लियाम लिविंगस्टनची बॅट चांगलीच तळपली. त्याने ५ चौकार आणि ९ गगनचुंबी षटकारांच्या साहाय्याने ९४ धावांची खेळी केली. मात्र ही खेळी व्यस्त केली. कारण अथर्व तायडेची खेळी सोडली तर इतर कुठल्याही फलंदाजाकडून त्याला हवी तशी साथ मिळाली नाही.

दिल्लीच्या विजयाने आता मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेऑफमध्ये जाण्याची संधी वाढली आहे.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

पंजाब किंग्ज: शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग

दिल्ली कॅपिटल्स:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसोव, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com