IPL Points Table: CSK अन् MI ची चिंता वाढली! सोप्या भाषेत समजून घ्या प्लेऑफचं समीकरण

Points Table: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वखाली खेळणारा गुजरात टायटन्स हा एकमेव संघ आहे जो आयपीएल २०२३ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.
points table
points table saam tv
Published On

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आतापर्यंत ६३ सामने झाले आहेत. तरीदेखील प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ कोणते हे कळु शकलेलं नाहीये. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वखाली खेळणारा गुजरात टायटन्स हा एकमेव संघ आहे जो आयपीएल २०२३ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

दिल्ली आणि हैदराबादचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर उर्वरित ७ संघांमध्ये प्लेईऑफमध्ये जाण्यासाठी स्पर्धा सुरु आहे.

points table
IPL 2023 Playoffs: LSG विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई स्पर्धेतून बाहेर? तर या २ संघांची लागली लॉटरी; पाहा समीकरण

उर्वरित ३ स्थानी पोहचण्यासाठी ४ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. येणारा प्रत्येक सामना हा सर्व संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. एक पराभवामुळे थेट स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येऊ शकतो. अशात कसे आहे प्लेऑफमध्ये जाण्याचे समीकरण? सोप्या शब्दात समजून घ्या.

गुजरात टायटन्स संघ हा आयपीएल २०२३ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मानला जातोय. या संघाने १३ सामन्यांपैकी ९ सामने जिंकून १८ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर १५ गुणांसह चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.

तर मुंबईला पराभूत करणारा लखनऊचा संघ आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या संघाचे देखील १५ गुण आहेत. मुंबईला पराभूत करून लखनऊचा संघ चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

तर मुंबई इंडियन्स संघ आता चौथ्या स्थानी पोहोचला आहे. मुंबईने १३ पैकी ७ सामने जिंकले आहेत. १४ गुणांसह हा संघ चौथ्या स्थानी घसरला आहे. मात्र मुख्य बाब म्हणजे, टॉप ४ मध्ये असलेला संघ कधीही बाहेर पडु शकतो.

मुंबई, चेन्नई आणि लखनऊ संघाला आणखी १-१ सामना खेळायचा आहे. जो संघ आपला शेवटचा सामना गमावणार तो संघ स्पर्धेतुन बाहेर पडु शकतो. तसेच जो संघ सामना जिंकेल तो संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. (Latest sports updates)

points table
IPL 2023, MI vs LSG: रोहित शर्माची एक चूक अन् स्टॉयनिसने साधली संधी; लखनौचे मुंबईला १७८ धावांचे आव्हान

टॉप ४ संघ सोडले तर पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानी असलेल्या संघांना देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १२ पैकी ६ सामने जिंकले आहेत. या संघाचे २ सामने अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे जर हे दोन्ही सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जिंकले तर या संघाचे १६ गुण होतील. असे झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो.

या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या संघाने आतापर्यंत असून फक्त एक सामना शिल्लक आहे. अशा परिस्थितीत या संघाने शेवटचा सामना जिंकून या संघाचे गुण १४ होतील. मात्र यानंतरही हा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकेल की नाही हे निश्चितपणे सांगतायेणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com