DC Vs SRH Highlights : हैदराबादचं वादळ दिल्लीनं रोखलं! स्टार्कचा पंच, डू प्लेसिसचं अर्धशतक, DC चा सलग दुसरा विजय

DC Vs SRH Match Highlights : विशाखापट्टणमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यामध्ये दिल्लीने हैदराबादवर विजय मिळवला आहे.
DC Vs SRH Highlights
DC Vs SRH Highlightsx (twitter)
Published On

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यामध्ये दिल्लीचा विजय झाला आहे. त्यांनी हैदराबादला ७ गडी राखून पराभूत केले आहे. गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे दिल्लीला आजचा सामना जिंकता आला. गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये देखील दिल्ली कॅपिटल्सने चांगला खेळ केला. सांघिक कामगिरीमुळे दिल्लीला विजय मिळाला.

विशाखापट्टणममध्ये आज आयपीएल २०२५ मधला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रंगला. या सामन्यामध्ये हैदराबादने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी केली. फलंदाजी करताना तुफानी फटके मारत जास्त धावा करण्याचा हैदराबादचा मानस होता. पण यात त्यांना अपयश आले. १८.१ ओव्हर्समध्ये हैदराबादने १६३ धावा केल्या.

DC Vs SRH Highlights
Kavya Maran : अबकी बार नय्या पार.. हैदराबादची फलंदाजी कोसळली अन् काव्या मारनला आलं रडू, मीम्स व्हायरल

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशान, नितीश कुमार रेड्डी यांच्यासह अगदी सगळेच खेळाडू फलंदाजीत अपयशी ठरले. सुरुवातीला हेड २२ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर अनिकेत वर्माने सर्वाधिक ७४ धावा केल्या. तर हेनरिक क्लासेनने ३२ धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजीपुढे हतबल झालेल्या हैदराबादच्या फलंदाजांना २०० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

DC Vs SRH Highlights
Srh vs Dc Live : सुपरमॅन.. हवेत झेपावून पकडला कॅच, दिल्लीच्या खेळाडूची फिल्डिंग पाहून सगळेच शॉक; Video व्हायरल

हैदराबादची प्लेईंग ११ -

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

दिल्लीची प्लेईंग ११ -

जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

DC Vs SRH Highlights
Aniket Verma : हेड, क्लासेन, शर्मा.. सगळे फेल, अनिकेत वर्मा एकटाच नडला; दिल्लीची धुलाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com