
IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात ४९ वा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर मात केली आहे. पंजाबने आजचा सामना ४ विकेट्सनी जिंकला आहे. या विजयाने पंजाबने पॉईंट्स टेबलवर मोठी झेप घेतली आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ चेन्नई सुपर किंग्स आहे. या विजयामुळे पंजाबचा संघ पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्या स्थानी घसरला आहे.
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी १९.२ ओव्हर्समध्ये १९० धावा केल्या. सॅम करनने सर्वाधिक ८८ धावा केल्या. युजवेंद्र चहलने एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. १९१ धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबने १९४ धावा केल्या.
सलामीसाठी आलेले शेख रशीद आणि आयुष्य म्हात्रे लवकर बाद झाले. रशीदने ११ धावा तर म्हात्रेने ७ धावा केल्या. रवींद्र जडेजा १७ धावा करुन परतला. डेवॉल्ड ब्रेविस आणि सॅम करन यांनी आक्रमक खेळत चांगली भागीदारी केली. पुढे ३२ धावांवर ब्रेविसची विकेट पडली. आठराव्या ओव्हरपर्यंत टिकून सॅम करनने ८८ धावा केल्या. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने एक षटकार, एक चौकार मारत ११ धावा केल्या. युजवेंद्र चहलने शेवटी ४ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय अर्शदीप सिंह आणि मार्को यान्सन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
१९१ धावांचे आव्हान गाठताना प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह मैदानात उतरले. २३ धावा करुन प्रियांश आर्य तंबूत परतला. प्रभसिमरन सिंहने अर्धशतकीय खेळी केली. ५४ धावांवर तो कॅचआउट झाला. नेहाल वधेरा ५ धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरने दमदार ७२ धावा केल्या. शशांक सिंहने १२ चेंडूत २३ धावा करत अय्यरला चांगली साथ दिली. शेवटच्या ओव्हरमध्ये मार्को यान्सनने विजयचा चौकार मारला.
चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -
प्रियांश आर्य, जॉश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार) नेहाल वढेरा, शशांक सिंह, हरप्रीत ब्रार, मार्को यान्सन, अजमतुल्लाह उमरजाई, सूर्यांश शेगडे, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह
इम्पॅक्टचे पर्याय - प्रभसिमरन सिंह, जेवियर बार्टलेट, प्रवीण दुबे, मुशीर खान, विजयकुमार वैशाक
पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -
शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवॉल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हूडा, एमएस धोनी, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथीराना
इम्पॅक्टचे पर्याय - अंशुल कंबोज, आर. अश्विन, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.