मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याआधी CSK शोक सागरात; स्टार खेळाडूच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

Mukesh Choudhary’s Mother death : मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याआधी CSK शोक सागरात बुडालं आहे. चेन्नईच्या स्टार खेळाडूच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.
 Mukesh Choudhary’s Mother death news
Mukesh Choudhary’s Mother death Saam tv
Published On
Summary

चेन्नईच्या संघ शोक सागरात

मुकेश चौधरीच्या आईचे निधन

मुकेशला चाहत्यांनी दिला सावरण्याचा सल्ला

आयपीएल स्पर्धेत आज गुरुवारी मुंबई इंडियन्स विरोधात चेन्नई सुपर किंग्स विरोधात सामना होणार आहे. आजचा सामना सुरू होण्याआधी चेन्नई सुपर किंग्स शोक सागरात बुडालं आहे. चेन्नई सुपर किंग्समधील गोलंदाज मुकेश चौधरी याच्या आईचे निधन झालं आहे.

 Mukesh Choudhary’s Mother death news
Rohit Sharma: असंभव!!! श्रेयस अय्यरचा सुपरमॅन कॅच पाहून सूर्या-रोहितही थक्क; आयपीएलच्या इतिहासातील खतरनाक झेल

आयपीएल स्पर्धेसाठी खेळत असताना मुकेश चौधरीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रेम देवी असे मुकेश चौधरीच्या आईचे नाव होतं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरू होते. दीर्घकाळ उपचार सुरू असतानाही त्या आजारातून बऱ्या होऊ शकल्या नाहीत.

चेन्नई सुपर किंग्सचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. याचदरम्यान मुकेशच्या आईच्या निधन झाल्याने संघासमोर समस्या वाढल्या आहेत. आईच्या निधनाची वार्ता कळताच मुकेशने सामने सोडून घरी परतला. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांचं सांत्वन करून स्पर्धेसाठी परतला. मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात मुकेश चौधरी खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 Mukesh Choudhary’s Mother death news
MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

मुकेश चौधरीने स्वत: आईच्या पार्थिवाला अग्नि दिली. अंत्यसंस्काराच्या दिवशी त्याचा भाऊ डॉ. राजेश देखील उपस्थित होते. राजेशच सीएसके कॅम्पमधून भीलवाडा येथे घेऊन गेले. आईच्या निधनाने मुकेश चौधरीला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर काही दिवसांत मुकेश आयपीएल स्पर्धेत पुन्हा परतण्याची शक्यता आहे. आईच्या निधनाने मुकेश चौधरी खचून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेत मुकेश कसा खेळणार, याकडे लक्ष लागलं आहे. दु:खद घटनेनंतर मुकेशच्या चाहत्यांनी त्याला सावरण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com