Prithvi Shaw: अवघ्या सहा महिन्यांत पृथ्वी शॉचा साखरपुडा मोडला; आकृती अग्रवाल म्हणाली, 'आमचं नातं संपलं...'

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा मार्चमध्ये झालेला साखरपुडा सहा महिन्यांत मोडला. आकृतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत वेगळे होण्याची माहिती दिली आणि गोपनीयतेची विनंती केली.
Prithvi Shaw and Akriti Agarwal announce their separation
Prithvi Shaw and Akriti Agarwal announce their separation Saam Tv
Published On

Prithvi Shaw: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल यांचा साखरपुडा अवघ्या सहा महिन्यांत मोडला आहे. आकृतीने १७ सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. त्यांचे वेगळं होण्यामागील नेमकं कारण मात्र दोघांनीही जाहीर केलेलं नाही.

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी ८ मार्च २०२६ रोजी साखरपुडा केला होता. पृथ्वीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत या नात्याची घोषणा केली होती. त्यानंतर चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र, आता काही महिन्यांतच त्यांच्या नात्याचा शेवट झाला आहे.

Prithvi Shaw and Akriti Agarwal announce their separation
Shehnaaz Gill: 'आज आम्ही थोडक्यात वाचलो...'; विमानातील धक्कादायक अनुभवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

आकृतीने काय म्हटलं?

आकृतीने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत लिहिलं की, अत्यंत जड अंतःकरणाने मी हे सांगत आहे की, माझ्या होणाऱ्या पतीसोबत (फियांसे) मी आमच्या भविष्यातील ध्येय आणि सध्याच्या परिस्थितीमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यात एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी असूनही, आम्ही हे स्वीकारले आहे की आमचे मार्ग आता एक नाहीत. सध्याची परिस्थिती आणि घटनांचा विचार करून आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे."

Prithvi Shaw and Akriti Agarwal announce their separation
UPI Payment Tax: ४० पैसे भरल्याने तुम्ही मरणार नाही; UPI टॅक्सवर नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य

आकृती पुढे लिहिते, "आम्ही आता पुढे जात आहोत आणि आमच्या दोघांसाठीही केवळ सुख आणि शांततेची अपेक्षा करत आहोत. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि या प्रकरणाबाबत कोणतेही तर्क-वितर्क किंवा अंदाज लावू नयेत."

पृथ्वी शॉ पुन्हा चर्चेत

पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेटमधील चर्चेतील युवा फलंदाज आहे. त्याने भारताकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळलं आहे. मात्र, गेल्या काही काळात तो राष्ट्रीय संघातील स्थानासाठी संघर्ष करत आहे. दरम्यान, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील या घडामोडीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com