

क्रिकेटमध्ये फलंदाजाला वेगवेगळ्या पद्धतीने बाद करता येतं. मात्र फलंदाज कधी कधी अशा पद्धतीने बाद होतात की पाहणारे पाहतच राहतात. अशीच एक विकेट युरोपियन लीगमध्ये पाहायला मिळाली. एक फलंदाज असा बाद झाला की तो कसा बाद झाला त्यालाही काही वेळ कळालं नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)
युरोपियन लीगच्या सामन्यादरम्यान एका फंलदाजाच्या विकेटची सोशल मीडियावर चर्चा आहे. फलंदाज एन फर्नांडो 16 चेंडूत 40 धावांवर खेळत होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान मोठा फटका मारायच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून मागे विकेटकीपरकडे गेला आणि त्याच्या हेल्मेटमध्ये अडकला. त्यानंतर अंपायरने फर्नांडोला बाद घोषित केलं. हे पाहून फर्नांडो देखील निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. (Latest Marathi News)
नियमानुसार बॅटला लागल्यानंतर चेंडू जमिनीवर न पडता फिल्डरने झेल घेतल्यास त्याला बाद घोषित केलं जातं. बॉल हेल्मेटमध्ये अडकल्यानंतर विकेटकीपरने तो कॅच घेतला. त्यामुळे नियमानुसार फर्नांडो याला अंपायरने बाद घोषित केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.