Sourav Ganguly: टीम इंडियाला कसा प्रशिक्षक हवा? गंभीरच्या नावाची चर्चा असताना सौरभ गांगुलीचा BCCIला सल्ला

Sourav Ganguly: बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू केलाय. भारतीय संघाच्या प्रशिक्षकासाठी गौतम गंभीरच्या नावाची चर्चा असतानाच सौरभ गांगुलीने गंभीरवर मोठ विधान केलंय.
Sourav Ganguly: टीम इंडियाला कसा प्रशिक्षक हवा? गंभीरच्या नावाची चर्चा असताना सौरभ गांगुलीचा BCCI सल्ला
Sourav Ganguly

बीसीसीआयकडून भारतीय टीमच्या नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला असून त्यासाठी बोर्डाने अर्ज मागवले आहेत. मुख्य प्रशिक्षकाच्या शोधासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचे अधिकारीही अनेक माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज प्रशिक्षकांच्या संपर्कात आहेत. प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे. गंभीरने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत केकेआर संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे.

एकाबाजूला टीम इंडिया अमेरिकेत टी २० वर्ल्ड कप २०२४ च्या तयारीमध्ये व्यस्त आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरु आहे. वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू केला आहे. यासाठी बोर्डाने केवळ अर्जच मागवले नसून तर काही दिग्गज खेळाडूंच्या संपर्कात आहेत. यात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे. याचदरम्यान बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने गंभीरबाबत मोठं विधान केलं आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने १ जून, शनिवार रोजी कोलकता येथे झालेल्या कार्यक्रमात नव्या प्रशिक्षक संबंधित प्रश्न विचारण्यात आली. टीम इंडियाला परदेशी प्रशिक्षकाची गरज आहे की देशांतर्गत प्रशिक्षकाची? गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनवले पाहिजे का? असे प्रश्न गांगुलीला विचारण्यात आले, त्यावर सौरभ गांगुलीने रोखठोक उत्तरे दिली.

माजी कर्णधार सौरभ गांगुली म्हणाले की, टीम इंडियासाठी भारतीय कोच हा चांगला पर्याय आहे. तसेच गौतम गंभीर एक चांगला प्रशिक्षक असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. याआधीही अनेक तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंनी गंभीरबाबत वेगवेगळी मते दिली आहेत.

गंभीरला कोचिंगचा अनुभव नाही पण त्याने सलग ३ हंगाम आयपीएलमध्ये काम केले आहे.त्याने लखनौ सुपर जायंट्ससोबत गेली २ वर्ष काम केले आहे. याच काळात फ्रँचायझीने दोन्ही वेळा प्लेऑफसाठी पात्रता मिळवली होती.आयपीएल फायनलनंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह गौतम गंभीरशी खूप वेळ गप्पा मारतानाही दिसले,त्यामुळे गंभीर प्रशिक्षक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Sourav Ganguly: टीम इंडियाला कसा प्रशिक्षक हवा? गंभीरच्या नावाची चर्चा असताना सौरभ गांगुलीचा BCCI सल्ला
IND vs BAN Warm-up Match: T20 विश्वचषकाची रंगीत तालीम! टीम इंडियाचा आज बांग्लादेशविरुद्ध सराव सामना; पाऊस खेळ बिघडवणार? असं असेल हवामान...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com