Sir Garfield Sobers : क्रिकेट विश्वावर शोककळा; महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांचं निधन

sir garfield sobers passes away : क्रिकेट विश्वातील महान अष्टपैलू खेळाडू सर गारफील्ड सोबर्स यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली.
Sir Garfield Sobers : क्रिकेट विश्वावर शोककळा; महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांचं निधन
Sir Garfield Sobers passes awaysocial media
Published On

जागतिक क्रिकेट विश्वातील दिग्गज क्रिकेटपटूंचे 'सर', विस्फोटक फलंदाजी, गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण यामुळं क्रिकेटला शिखराएवढी उंची मिळवून देणारे वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू गारफील्ड सोबर्स यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. क्रिकेट वेस्ट इंडिजने सोशल मीडियावर पोस्ट करून सोबर्स यांना श्रद्धांजली वाहिली. सर गारफील्ड सोबर्स यांना सर गॅरी सोबर्स नावानंही ओळखले जायचे.

जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये सर गॅरी सोबर्स यांना गणले जात होते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवरील खेळानं क्रिकेटला नवी ओळख निर्माण करून दिली होती. जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघ अशी वेस्ट इंडिजची ओळख होती. त्यावेळी सोबर्स हे देशाचे प्रतिनिधीत्व करत होते. अष्टपैलू प्रतिभेमुळं त्यांना जगातील महान खेळाडूंच्या यादीत कायमचं अग्रस्थान मिळालं होतं.

कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी

सर गारफील्ड सोबर्स वेस्ट इंडिजकडून ९३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात १६० डावांमध्ये त्यांनी ८०३२ धावा केल्या. त्यांची धावांची सरासरी ५७.७८ इतकी होती. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६ शतके, ३० अर्धशतके, दोन द्विशतके आणि त्रिशतकही झळकावले आहे. ३६५ ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्यावेळी हा कसोटी क्रिकेटमधील विश्वविक्रम होता. बरीच वर्षे तो कायम होता.

सोबर्स केवळ महान फलंदाज नाहीत, तर उत्कृष्ट गोलंदाजही होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी २३५ विकेट घेतल्या. तर गोलंदाजी सरासरी ३४.०४ आणि इकॉनॉमी २.३३ इतकी होती. सहा डावांत त्यांनी प्रत्येकी पाच विकेट, आठ वेळा चार विकेट आणि ६ बाद ७३ धावा ही त्यांची सर्वोच्च कामगिरी होती. गॅरी सोबर्स हे प्रतिभावान गोलंदाज होते. संघाच्या गरजेनुसार, ते लेफ्ट आर्म फास्ट मीडियम, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन किंवा लेफ्ट आर्म अनऑर्थोडॉक्स स्पिन गोलंदाजी करायचे. त्यांना चायनामॅन म्हणून संबोधले जात होते.

फक्त १ वनडे सामना

सर सोबर्स यांना अवघ्या एका वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्यांना धावा करता आल्या नाहीत, मात्र एक विकेट घेतली होती. सर गॅरी सोबर्स यांना क्रिकेटमधील पहिले आधुनिक ऑलराउंडर म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या फलंदाजीची शैली, गोलंदाजीतली वैविध्यता आणि मैदानात क्षेत्ररक्षण करतानाचा चपळपणा यामुळे त्यांची गणना प्रतिभावान खेळाडूंमध्ये व्हायची. सर सोबर्स यांच्या निधनानं क्रिकेट विश्वानं महानायक गमावला आहे. त्यांची महान क्रिकेट कारकीर्द क्रिकेटमध्ये येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Sir Garfield Sobers : क्रिकेट विश्वावर शोककळा; महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांचं निधन
Rohit Sharma update : रोहित शर्मा वनडेमधून रिटायर होणार का? बीसीसीआयचा हिटमॅनच्या कोर्टात चेंडू, पडद्यामागे मोठ्या घडामोडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com