नवी दिल्ली : टीम इंडियाची (Team India) भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनताच त्याने शानदार शतक झळकावले आहे. चालू मोसमातील 7 सामन्यांमधले पुजाराचे हे 5 वे शतक आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने सुद्धा काऊंटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात 4 बळी टिपत शानदार सुरुवात केली. (Cheteshwar Pujara Cricket News)
चेतेश्वर पुजाराने 182 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 115 धावा केल्या. त्याच्या नाबाद शतकाच्या जोरावर, सक्सेस संघाने काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन २ सामन्याच्या पहिल्या दिवशी 4 बाद 328 धावा करून आपली स्थिती मजबूत केली. तत्पूर्वी, मिडलसेक्सने नाणेफेक जिंकून ससेक्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
फलंदाजीसाठी ससेक्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही, संघाची धावसंख्या केवळ 18 असताना, सलामीवीर अॅलिस्टर ऑर माघारी परतला. यानंतर टॉम अल्स्पोप आणि टॉम क्लार्कने दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सांभाळला.
क्लार्क बाद झाल्यानंतर अलॉस्पने पुजारासह तिसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 318 पर्यंत नेली. अलॉस्पने 277 चेंडूत 135 धावांची खेळी खेळली. मिडलसेक्सकडून टॉम हेल्मने 3 बळी घेतले.
वॉशिंग्टन सुंदरचे 69 धावांत 4 बळी
भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध लँकेशायरकडून 20 षटकांत 69 धावा देत 4 बळी घेतले. सुंदरने विल यंग, रॉब केयो, रायन रिक्लेटन आणि टॉम टेलर यांच्या विकेट घेतल्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुंदरने शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता.
22 वर्षीय वॉशिंग्टन सुंदर हाताच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये बोटाला दुखापत झाल्यानंतर सुंदरने दीर्घ फॉर्मेटमध्ये पुनरागमन केले आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.