नवी दिल्ली : वनडे मालिकेसाठी टीम इंडिया (Team India) वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहोचली आहे. या दौऱ्याची सुरुवात २२ जुलैपासून होणार आहे. कर्णधार रोहित शर्माला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी शिखर धवन वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. यानंतर रोहित पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघात परतणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकदा फनी व्हिडिओ शेअर करणाऱ्या शिखरने इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम इंडिया पूर्ण जोशात दिसत आहे. हा व्हिडिओ विमानतळावरील दिसत आहे.
शिखर धवनने शेअर केलेल्या फनी व्हिडिओमध्ये (Video) टीमचा कोच राहुल द्रविडची एन्ट्री सर्वात खास आहे. तोही बाकीच्या खेळाडूंसोबत विमानतळातून बाहेर पडताना दिसत आहे. शिखरच्या या व्हिडिओवर दिनेश कार्तिकनेही कमेंट केली आहे. 'असे स्टंट फक्त शिखरच करू शकतो.' अशी कमेंट कार्तिकने केली आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे.
शिखर धवन अजूनही भारतीय वनडे संघाचा भाग आहे. पण, तो कसोटी आणि टी-२० संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसह भारतीय वनडे संघात पुनरागमन केले. भारताने (Team India) २-१ ने ही मालिका जिंकली. मात्र, या मालिकेत धवनची कामगिरी काही खास नव्हती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद ३१ धावांची खेळी केली. पण, पुढच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये तो खेळ शकला नाही.
९ आणि १ धावा करून शिखर धवन बाद झाला. आता तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा फॉर्म येणार का हे पाहावे लागणार आहे. कर्णधार आणि सलामीवीर अशी दुहेरी भूमिका बजावण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे.
रोहित शर्माशिवाय विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे संघात शुबमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग या खेळाडूंना एकदिवसीय मालिकेत स्थान देण्यात आले आहे, त्यामुळे या युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.