CSK VS GT: आयपीएल २०२३ स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आज जेतेपद मिळवण्यासाठी आमने सामने येणार आहेत. एकीकडे गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ असणार आहे.
तर दुसरीकडे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्ज संघ असणार आहे, गुजरात टायटन्सचा संघ आपले दुसरे जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
तर दुसरीकडे चेन्नईचा संघ पाचवे जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कशी असेल गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग ११.
ही जोडी करणार डावाची सुरुवात..
या सामन्यात देखील शुभमन गिल आणि वृद्धिमान साहाची जोडी मैदानात येऊ शकते. शुभमन गिल ज्याप्रकारे फलंदाजी करतोय, ते पाहता त्याच्यावर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे तर यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा त्याला साथ देताना दिसून येऊ शकतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर साई सुदर्शन फलंदाजीला येऊ शकतो.
मध्यक्रमात या फलंदाजांना मिळू शकते संधी..
गुजरात टायटन्स संघाचा मध्यक्रम देखील मजबूत आहे. कर्णधार हार्दिक पंड्या स्वतः मोठे फटके खेळण्यास माहीर आहे. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर डेव्हिड मिलर आणि विजय शंकरसारखे विस्फोटक फलंदाज आहेत. तर सातव्या क्रमांकावर राहुल तेवतिया फलंदाजीला येईल. हे तीनही फलंदाज कुठल्याही क्षणी येऊन सामना फिरवू शकतात. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघातील गोलंदाजांना सावध राहावं लागणार आहे. (Latest sports updates)
या गोलंदाजांसह उतरणार मैदानात
गुजरात टायटन्स संघाकडून मोहम्मद शमी, मोहित शर्मा हे वेगवान गोलंदाजी करताना दिसून येतील. हे दोघेही गोलंदाज जोरदार फॉर्ममध्ये आहेत. मोहम्मद शमीने सर्वाधिक २८ गडी बाद करत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे.
तर मोहित शर्माने २४ गडी बाद केले आहेत. तर फिरकी गोलंदाज राशिद खान देखील जोरदार कामगिरी करतोय. त्याने आतपर्यंत २७ गडी बाद केले आहेत. हे तिघेही गोलंदाज पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.
चेन्नई विरुद्ध होणाऱ्या सामन्यात अशी असू शकते गुजरत टायटन्स संघाची प्लेइंग ११:
शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, नूर अहमद, मोहम्मद शमी, राशिद खान, मोहित शर्मा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.