IPL 2023 Points Table: चेन्नईच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर; राजस्थानने अव्वल स्थान गमावलं, मुंबईचीही घसरण

IPL Points Table: चेन्नई सुपरकिंग्ज आणि आरसीबीच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.
IPL 2023 Points Table
IPL 2023 Points TableTwitter/@IPL
Published On

IPL 2023 Points Table: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १६ वा हंगाम जोमात सुरू आहे. टॉप ४ मध्ये फिनिश करण्यासाठी प्रत्येक संघामध्ये चढाओढ सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स वगळता यंदाच्या आयपीएल स्पर्धेत जवळपास सर्वच संघांनी चांगली कामगिरी केली आहे. रविवारी आयपीएलमध्ये डबल हेडर सामने खेळवण्यात आले. (Latest Marathi News)

पहिल्या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा ७ धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाईट राईडर्सला तब्बल ४९ धावांनी पराभवाची धूळ चारली. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्ज आणि आरसीबीच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.

IPL 2023 Points Table
KKR VS CSK Match Result: चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे कोलकाताचे फलंदाज ढेपाळले; धोनी सेनेचा 'रॉयल' विजय

आयपीएलच्या साखळी सामन्यांचा थरार सुरू असताना बीसीसीने प्लेऑफ आणि फायनलचे वेळापत्रक जाहीर केले. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखेनुसार, आयपीएल २०२३ चा पहिला क्वालिफायर सामना २३ मे रोजी आणि एलिमिनेटर सामना २४ मे रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे. (Latest sports updates)

तर दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना २६ आणि २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून यात तब्बल १ लाख प्रेक्षक एकत्र बसून सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. अशातच जास्तीत जास्त साखळी सामने जिंकून टॉप ४ मध्ये येण्यासाठी संघांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

आरसीबीची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व केले. विराटच्या नेतृत्वात आरसीबीने दमदार कामगिरी करत घरच्या मैदानावर विजय मिळवला. आरसीबीने गेल्या दोन सामन्यात सलग दोन विजय मिळवले आहेत. या विजयासह त्यांनी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ आठव्या स्थानावर होता तर मुंबईचा संघ सहाव्या स्थानावर होता. आरसीबीने विजय मिळवून मुंबईला गुणतालिकेत खाली ढककले आहे.

IPL 2023 Points Table
Virat Kohli Flying Kiss: विराट कोहली 40 हजार लोकांसमोर रोमँटिक झाला, कॅच घेतल्यानंतर अनुष्काला दिला 'फ्लाइंग किस', व्हिडीओ व्हायरल

चेन्नई सुपरकिंग्ज गुणतालिकेत अव्वल स्थानी

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. चेन्नईने यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७ सामने खेळले असून यातील ५ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, कोलकाताविरुद्धच्या विजयामुळे त्यांनी अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. याशिवाय ४९ धावांच्या विजयामुळे चेन्नई सुपरकिंग्जचा नेट रनरेटही चांगलाच सुधारला आहे.

आयपीएल २०२३ पॉईंट टेबल

चेन्नई सुपरकिंग्ज: ७ सामने, ५ विजयी, २ पराभूत, १० गुण

राजस्थान रॉयल: ७ सामने, ४ विजयी, ३ पराभूत, ०८ गुण

लखनौ सुपरजायंट्स: ७ सामने, ४ विजयी, ३ पराभूत, ०८ गुण

गुजरात टायटन्स: ६ सामने, ४ विजयी, २ पराभूत, ०८ गुण

पंजाब किंग्ज: ७ सामने, ४ विजयी, ३ पराभूत, ०८ गुण

मुंबई इंडियन्स: ६ सामने, ३ विजयी, ३ पराभूत, ०६ गुण

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com