Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसणार, चॅम्पियन्स ट्रॉफी बाहेरच्या देशात होणार?

Champions Trophy 2025, Pakistan Vs India : वर्ल्डकप स्पर्धेनंतर आयसीसीच्या महत्वाच्या असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. भारताने पाकिस्तानात जायला नकार दिल्यानंतर ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर खेळवली जाण्याची शक्यता आहे.
india vs Pakistan Champions Trophy
india vs Pakistan Champions Trophysaam tv
Published On

बीसीसीआयनं पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी जाण्यास नकार दिल्यानंतर 'खडूस' पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं 'अॅटिट्यूड' दाखवायला सुरुवात केली. पण हाच 'अॅटिट्यूड' पीसीबीला नडणार आहे. आयसीसी आता अॅक्शन मोडमध्ये आली असून, या स्पर्धेच्या वेळापत्रकासंदर्भात अन्य देशांसोबत चर्चा सुरू केली आहे, असे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर आता ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात खेळवली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी पीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेची चर्चा

पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका हा एक पर्याय असू शकतो, अशी जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात होती. पण पीटीआयच्या रिपोर्टमधील दाव्यानुसार मंगळवारी आयसीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही.

स्पर्धेचे वेळापत्रकही तूर्तास स्थगित

भारताचा पाकिस्तानात जाण्यास नकार, त्यात स्पर्धा पाकिस्तानबाहेर खेळवली जाण्याची शक्यता अशा चर्चा सुरू असतानाच, आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर केले नाही. तूर्तास ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे. ११ नोव्हेंबर रोजी लाहोरमध्ये वेळापत्रक जाहीर होणार होते. पाकिस्तानही या स्पर्धेचे देशाबाहेर यजमानपद भूषवण्यास किंवा यूएईमध्येही ही स्पर्धा भरवण्यास इच्छुक नसल्याचे कळते.

पीसीबीचं आयसीसीला पत्र

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्राद्वारे सांगितले की, देशात सुरक्षेचा कोणताही प्रश्न नाही. अलीकडेच इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाविरुद्धच्या मालिकांचे यजमानपद भूषवलं. याशिवाय पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुद्धा हेच आश्वासन दिले आहे.

india vs Pakistan Champions Trophy
Champion Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून माघार घेऊ शकतो पाकिस्तान

२०१२ मध्ये दोन्ही देशांत झाली होती मालिका

भारत आणि पाकिस्तान या दोन संघांनी २०१२ नंतर कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली नाही. मात्र, गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकप स्पर्धेसह आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी पाकिस्ताननं आशिया कपचं यजमानपद भूषवलं होतं. ही स्पर्धाही हायब्रिड मॉडेलमध्ये झाली होती. कारण भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. भारतीय संघ त्यावेळी सर्व सामने श्रीलंकेत खेळला होता.

india vs Pakistan Champions Trophy
IND vs AUS, Pitch Report: पहिल्या कसोटीआधी टीम इंडियासाठी बॅड न्यूज! पर्थमधून समोर आली मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com