Champions Trophy 2025 : टीम इंडियाची घोषणा या दिवशी होणार, असा असेल संभाव्य संघ

Team India Sqaud for Champions Trophy 2025 Update : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या घोषणेला विलंब होऊ शकतो. भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडशी लढत होईल.
Team India Sqaud For champions Trophy
Team India Sqaud For champions Trophysaam tv
Published On

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही अत्यंत महत्वाची मानली जाणारी स्पर्धा पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत १९ तारखेपासून सुरू होत आहे. मात्र, अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा उशिरा होण्याची शक्यता आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, ही स्पर्धा हायब्रिड मॉडलनुसार खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या कराची, लाहोर आणि रावलपिंडी या तीन शहरांसह दुबईत या स्पर्धेतील सामने होणार आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन संघांत पहिला सामना होईल. तो कराचीमध्ये होणार आहे. तर भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध होणार आहे.

बीसीसीआयची आयसीसीला विनंती

भारतीय संघाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या घोषणेला विलंब होऊ शकतो. अजित आगरकरच्या नेतृत्वात निवड समिती १२ जानेवारीपर्यंत मुख्य संघाची घोषणा करणार असल्याचे आधी सांगण्यात येत होते. पण आता भारतीय संघाच्या निवडीला आणखी उशिर होण्याची शक्यता आहे. आता भारतीय संघाची घोषणा १८ किंवा १९ जानेवारीला होऊ शकते.

महिनाभराआधी करावी लागते संघाची घोषणा

आयसीसीच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना किमान महिनाभराआधी मुख्य संघ तात्पुरत्या स्वरुपात घोषित करावा लागतो. त्यानंतर त्यात बदलही केला जाऊ शकतो. मात्र, यावेळी आयसीसीने स्पर्धा सुरू होण्याच्या पाच महिन्यांआधीच सर्व संघांना खेळाडूंची यादी पाठवण्यास सांगितले होते. १२ जानेवारीपर्यंत संघांतील खेळाडूंची नावं पाठवायची होती. मात्र, भारतीय संघ जाहीर करण्यास विलंब होऊ शकतो.

बीसीसीआय नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा हवाला देत ही मुदत वाढवून देण्याची मागणी करू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीसह इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही भारतीय संघाच्या निवडीला उशिर होऊ शकतो.

टी २० मालिकेसाठी संघाची घोषणा लवकरच

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघात जे खेळाडू असतील, त्यातील बरेच खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही खेळू शकतात. दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी येत्या एक दोन दिवसांत संघाची घोषणा होऊ शकते. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ज्यांना संधी मिळाली होती, त्याच खेळाडूंना यावेळीही संधी मिळू शकते. टी २० संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांना खेळवण्याची शक्यता खूप कमी आहे, असे बोलले जात आहे.

Team India Sqaud For champions Trophy
Team India Squad: जयस्वालची एन्ट्री होणार, पण विराटच्या खास भिडूला बसावं लागेल

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव किंवा रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंग

Team India Sqaud For champions Trophy
Team India Playing XI: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताची प्लेइंग ११ ठरली? या खेळाडूंना मिळू शकते संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com