फुटबॉल विश्वावर कोसळला दु:खाचा डोंगर; फुटबॉल प्रशिक्षकांचं निधन

Cesar Luis Menotti Death: अर्जेंटिनाच्या संघाला १९७८ मध्ये पहिलं विश्वचषक जिंकून देणारे फुटबॉल रोमँटिक सेझर लुईस मेनोट्टी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहे.
Cesar Luis Menotti Death
Cesar Luis Menotti DeathCanva

अर्जेंटिनाच्या संघाने १९७८ मध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकात पहिलं विश्वकप जिंकलं होतं. संघाला पहिलं विश्वकप मिळवून देणारे प्रशिक्षक सेझर लुईस मेनोट्टी यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले आहे. या वृत्ताला अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने दुजोरा दिला असून रविवार ५ मे रोजी त्यांनी ही माहिती माध्यमांना दिली. रोझारियो सेंट्रल, बोका ज्युनियर्स आणि सँटोस या संघामधून मेनोट्टी यांनी फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर नेवेलच्या ओल्ड बॉईज या संघामधून आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली होती.

Cesar Luis Menotti Death
Ind Vs Aus World Cup Final Match : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोण मारणार बाजी?

मेनोट्टी यांना अर्जेंटिनाचे माजी वर्ल्ड चॅम्पियन प्रशिक्षक देखील पदवी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक खेळाडूच्या फुटबॉल खेळण्याचे स्वप्न खरं होता दिसले आहे.

सेझर लुईस मेनोट्टी यांचा जन्म १९३८ मध्ये रोझारियो येथे झाला. त्यानंतर मेनोट्टीने १९६० च्या दशकात आपल्या उत्कृष्ट फुटबॉल खेळण्याच्या जोरावर त्यांनी अल्बिसेलेस्टेसाठी ११ कप जिंकले. त्यानंतर त्यांनी ३७ वर्षी प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळताना ११ क्लब सोबतच दोन राष्ट्रीय संघाचे व्यवस्थापन केले आहे. १९८२ च्या विश्वचषकानंतर मेनोट्टीने बार्सिलोना या संघाचे प्रशिक्षक म्हणूनदेखील काम केले. मेनोट्टीने १९८३च्या कोपा डेल रे या स्पर्धेसाठी संघाला मार्गदर्शन केले होते..

दरम्यान मेनोट्टीच्या निधनानंतर अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करत तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. एएफएचे अध्यक्ष क्लॉडिओ तापिया म्हणाले की, ''मेनोट्टी यांनी अर्जेंटिनाचा राष्ट्रीय संघ आणि फुटबॉलच्या संघाला खूप काही शिकवले आहे. त्यांचे फुटबॉलवरील प्रेम आमच्या कायम लक्षात राहिल.''

सेझर लुईस मेनोट्टी कसले उपचार घेत होते?

मेनोट्टी यांना मार्चमध्ये ॲनिमिया सारखा गंभीर आजार झाला होता. त्यादरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एप्रिलमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवस त्यांची स्थिती चांगली होती. मात्र ६ मे रोजी त्याचे निधन झाले आणि फुटबॉल जगातात दु:खाचा डोंगर कोसळला. माहितीनुसार रविवारी पोटाच्या कर्करोगामुळे त्यांचे निधन झाल्याचं सांगितलं जात आहे, परंतु मेनोट्टी यांच्या मृत्यूचे खरं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये.

Cesar Luis Menotti Death
FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषकात मेस्सीची जादू! अर्जेंटिना बनणार विश्वविजेता?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com