ms dhoni
ms dhonisaam tv news

MS Dhoni : एमएस धोनीवर फिक्सिंगचे आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्यावर मोठी कारवाई! मद्रास उच्च न्यायालयाने सुनावली शिक्षा

IPS Officer Arrested: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीवर मॅच फिक्सिंगचा दावा करणाऱ्या आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना मद्रास उच्च न्यायालयाने १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
Published on

MS Dhoni IPL 2013 Match Fixing Case:

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीवर मॅच फिक्सिंगचा दावा करणाऱ्या आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना मद्रास उच्च न्यायालयाने १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

धोनीने या प्रकरणात न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती. २०१३ त्या मॅच फिक्सिंग आणि बेटिंगमध्ये एमएम धोनीचा देखील हात होता असा दावा संपत कुमार यांनी केला होता.

बार आणि बेंचने दिलेल्या वृत्तानुसार,संपत कुमार यांना या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी मद्रास न्यायालयाचे न्यायमूर्ती सुंदर मोहन आणि एसएस सुंदर यांनी ३० दिवसांचा अवधी दिला आहे.

एमएस धोनीने उच्च न्यायालयात झी मीडिया संपत कुमार आणि इतरांवर मानहानीचा दावा ठोकला होता. २०१३ आयपीएल सामन्यादरम्यान मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा करणारे वक्तक्य केल्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असल्याचा आरोप एमएस धोनीने केला होता.

या फिक्सिंग प्रकरणाचा प्राथमिक तपास करण्याची जबाबदारी संपत कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यावेळी धोनीने या प्रकरणात संपत कुमार,झी आणि इतरांना वक्तव्य करण्यापासून रोखण्यात यावं अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. (Latest sports updates)

ms dhoni
IND vs SA,3rd T20I: सूर्याच्या दुखापतीने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन! सामन्यानंतर समोर आली मोठी अपडेट

एमएम धोनीविरुद्ध कुठलेही वक्तव्य करु नये असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशानंतर कुमार, झी आणि इतरांनी लेखी उत्तर दिलं होतं. असं असतानाही संपत कुमार यांनी धोनीविरुद्ध बदनामी करणारी वक्तव्य केली. याच कारणामुळे धोनीने कुमार यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अपमान केल्याची याचिका दाखल केली होती.

ms dhoni
IND vs SA 3rd T20I: द.आफ्रिकेत सूर्यकुमार चमकला ! या मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com