

Ind vs Aus 2nd inning update: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या मैदानावर सुरु आहे. या सामनात भारतीय संघातील फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. पहिल्या डाव १०९ धांवावर संपुष्ठात आल्यानंतर आता भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर संपुष्ठात आला आहे. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला ७६ धावांची गरज आहे.(Latest sports updates)
भारतीय संघाचा दुसरा डाव धावांवर संपुष्ठात..
या सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाज अडचणीचा सामना करताना दिसून आले. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा हा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. चेतेश्वर पुजाराने ५९ धावांची खेळी केली.
तर रोहित शर्माने १२, श्रेयस अय्यरने २६ आणि विराट कोहलीने १३ धावांची खेळी केली. पुजाराला वगळता इतर कुठलाही फलंदाज या सामन्यात अर्धशतकी खेळी करू शकला नाहीये.
पहिल्या दिवशी आघाडीवर असलेला ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. मात्र उमेश यादव आणि आर अश्विनने भारतीय संघाला जोरदार कमबॅक करून दिले. दुसऱ्या दिवशी पीटर हॅंड्सकॉम्ब बाद होताच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९७ धावांवर संपुष्टात आला होता. या डावात रवींद्र जडेजाने सर्वाधीक ४, उमेश यादवने ३ आणि आर अश्विनने ३ गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.