भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील कोणत्याही खेळाचा सामना असो, हा सामना चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष असतंच. शनिवारी इमर्जिंग एशिया कप स्पर्धेमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये नेहमीप्रमाणे भारताने पाकिस्तानचा पराभव केला. मात्र या सामन्यात एक हायव्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळाला.
तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली खेळवल्या गेलेल्या या सामन्यात ७ रन्सने भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने या स्पर्धेची विजयी सुरुवात केली. मात्र सामन्यादरम्यान भारत आणि पाकिस्तानचे दोन खेळाडू एकमेकांशी भिडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या सामन्यादरम्यान पाकिस्तानी गोलंदाज सुफियान मुकीम भारतीय फलंदाज अभिषेक शर्मासोबत भिडला. मुळात यावेळी अभिषेकने 22 बॉल्समध्ये पाच चौकार आणि दोन सिक्सच्या मदतीने 35 रन्सची खेळी केली. त्याने ही खेळी अगदी झटपट खेळली. टीमसाठी आणि स्वतःसाठी एक चांगली सुरुवात केल्यानंतर सातव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर तो बाद झाला. मुकीम ही ओव्हर टाकत होता. अभिषेकने ऑफ-साइडवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण कासिम अक्रमने तो कॅच घेत पाकिस्तानला पहिली विकेट मिळवून दिली.
अभिषेक शर्माला बाद केल्यानंतर मुकीमने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुकीमने शर्माला गप्प राहण्याचा इशारा करत बाहेर जाण्यास सांगितलं. अभिषेकने ही त्याच्या या कृत्यावर त्याला प्रत्युत्तर दिलं. यावेळी अभिषेक मुकीमकडे जात होता मात्र, यादरम्यान मैदानावरील अंपायर चमारा डी झोयसा यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी मध्यस्ती करत प्रकरण शांत केलं. दरम्यान या दोघांच्या या ड्राम्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार तिलक वर्मा यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 183 रन्स केले. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे फलंदाज शेवटच्या बॉलपर्यंत खेळूनही 176 रन्स पर्यंतच पोहोचू शकले. अखेरच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला १७ रन्सची गरज होती. मात्र पण वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.