WTC Points Table: श्रीलंकेच्या विजयाने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! WTC फायनलमध्ये जाण्यासाठी 3 संघांमध्ये चढाओढ

SL vs NZ, WTC Points Table: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं आहे.
WTC Points Table: श्रीलंकेच्या विजयाने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! WTC फायनलमध्ये जाण्यासाठी 3 संघांमध्ये चढाओढ
srilanka cricket teamtwitter
Published On

श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये श्रीलंकेचा जलवा पाहायला मिळाला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून १-० ची आघाडी घेणाऱ्या श्रीलंकेने न्यूझीलंडचा १ डाव आणि १५४ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह मालिका तर जिंकली, यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेचं समीकरणही बदललं आहे. या यादीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या आणि श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

या यादीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. तर ६२.५ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडला पराभूत करणारा श्रीलंकेचा संघ ५५.५६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारत,ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या तिन्हीसंघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

WTC Points Table: श्रीलंकेच्या विजयाने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! WTC फायनलमध्ये जाण्यासाठी 3 संघांमध्ये चढाओढ
IND vs BAN: 3 वर्ष संघाबाहेर असलेल्या गोलंदाजाला टीम इंडियात संधी! गंभीर सोबत आहे खास कनेक्शन

न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी

न्यूझीलंडने या दौऱ्यावर निराशाजनक कामगिरी केली आहे. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ ४२.८५ टक्के विजयाच्या सरासरीसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी होता.

मात्र या सामन्यात पराभव होताच न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी पोहोचला आहे. आता या संघाची सरासरी ३७.५ वर येऊन पोहोचली आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारतीय संघाविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे.

WTC Points Table: श्रीलंकेच्या विजयाने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! WTC फायनलमध्ये जाण्यासाठी 3 संघांमध्ये चढाओढ
IND vs BAN 2nd Test: पावसाचा खेळ चाले... एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा समारोप, चाहत्यांच्या आशेवर पाणी!

न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करणार आहे. या मालिकांमध्ये जर श्रीलंकेने चांगली कामगिरी केली आणि मालिका जिंकल्या, तर श्रीलंकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करु शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com