Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!

Mumbai Indians Bowling Coach: आगामी आयपीएल हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!
team india head coach yandex
Published On

आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. आगामी हंगामापूर्वी मुंबईने, भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. आगामी हंगामात पारस म्हाम्ब्रे हे लसिथ मलिंगासह गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतील.

पारस म्हाम्ब्रेआधी श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धनेवर मुंबई इंडियन्सने मोठी जबाबदारी सोपवली होती. गेले काही वर्ष दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू मार्क बाऊचरने या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली.

मात्र त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी मुंबईने महेला जयवर्धनेची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. यासह पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे.

Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!
IND vs NZ: पहिल्या दिवसाचा खेळ रद्द होणार? बंगळुरुतून समोर आली मोठी अपडेट

आता मुंबईच्या डगआऊटमध्ये पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू असणार आहेत. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू आणि गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा देखील आगामी हंगामात गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!
IND vs NZ, 1st Test: न्यूझीलंडला मोठा धक्का! संघातील प्रमुख खेळाडू पहिल्या कसोटीला मुकणार

हे दोघेही युवा गोलंदाजांसोबत आपला अनुभव शेअर करताना दिसतील. पारस म्हाम्ब्रे आल्याने कोचिंग स्टाफ आणखी मजबूत झाला आहे. त्यांची मुंबई इंडियन्सला प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ नसणार आहे. यापूर्वीही ते मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com