T20 Cricketer Of The Year: एकच वादा, सूर्या दादा! सलग दुसऱ्यांदा 'टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर'पुरस्काराचा मानकरी

Suryakumar Yadav: भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे
suryakumar yadav
suryakumar yadavsaam tv news
Published On

Suryakumar Yadav Named As T20 Cricketer Of The Year 2023:

भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. नुकताच आयसीसीने टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्कारात अल्पेश रमाजानी,मार्क चॅपमन आणि सिंकदर रझा यांना मागे सोडत सूर्यकुमार यादवने या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. त्याने २०२३ मध्ये दमदार खेळ केला आहे. त्याने १८ सामन्यांमध्ये ४८.८६ च्या सरासरीने ७३३ धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादवची २०२३ मधील दमदार कामगिरी..

२०२३ मध्येही सूर्यकुमार यादवचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याने टी-२० क्रिकेटमधील १७ डावात ७३३ धावा केल्या आहेत. २०२२ मध्येही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. २०२२ मध्येही त्याने या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. आयसीसीने २०२१ मध्ये हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली होती. २०२१ मध्ये मोहम्मद रिजवानने या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. (Latest sports updates)

suryakumar yadav
IND vs ENG 1st Test: भारत- इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान पाऊस पडणार? वाचा हवामानाचा लेटेस्ट अंदाज

नेतृत्वातही सूर्यकुमार यादवचा बोलबाला..

फलंदाजीसह नेतृत्वातही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत त्याला टी-२० संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली गेली होती. ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडत त्याने भारत- ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवून दिली होती.

suryakumar yadav
IND vs ENG Live Streaming: केव्हा,कधी अन् कुठे पाहता येईल भारत- इंग्लंड पहिला कसोटी सामना? इथे पाहा फुकटात

त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही त्याला संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. या दौऱ्यावर ३ सामन्यांची मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली होती. मात्र या मालिकेतील शेवटच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर तो मैदानावर कमबॅक करु शकलेला नाही. त्याच्या दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून लवकरच तो मैदानावर कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com