Ben Stokes :पट्ठ्यानं इतिहास रचलाय, 'या' बाबतीत ख्रिस गेल अन् सेहवागलाही सोडलंय मागे

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावे एका मोठया विक्रमाची नोंद झाली आहे.
Ben Stokes
Ben StokesSaam Tv

Ben Stokes: सध्या इंग्लंड संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघ मजबूत स्थितीत आहे. इंग्लंड संघातील आक्रमक फलंदाजी करत ३०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावे एका मोठया विक्रमाची नोंद झाली आहे. (Latest Sports Updates)

इंग्लंड संघ सध्या कसोटी क्रिकेटमध्येही वनडे आणि टी-२० स्टाईल फलंदाजी करताना दिसून येत आहे. इंग्लंडचे फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करून विरोधी संघातील गोलंदाजांना बॅकफूटवर टाकण्याचं काम करत आहेत.

दरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स देखील न्यूझीलंड संघाविरुद्ध फलंदाजी करताना आक्रमक फलंदाजी करताना दिसून आला आहे. न्यूझीलंड संघाविरुद्व फलंदाजी करताना त्याने २ षटकार मारताच त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

Ben Stokes
IND VS AUS 2nd Test: टीम इंडियाचं जोरदार कमबॅक!ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला

बेन स्टोक्सने आतापर्यंत एकूण ९० सामन्यांमध्ये १०९ षटकार मारले आहेत. या यादीत त्याने ब्रॅंडन मॅक्युलमला मागे सोडलं आहे. त्याने १०७ षटकार मारले होते. तर ऍडम गिलख्रिस्टने १०० षटकार मारले होते. तर ९८ षटकारांसह ख्रिस गेल चौथ्या स्थानी आहे.

तर भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग या यादीत सहाव्या स्थानी आहे. सेहवागने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ९१ षटकार मारले आहेत.

Ben Stokes
IND vs AUS 2nd Test :पुजाराचं अनोखं शतक! मैदानात उतरताच झाली 'या' मोठ्या विक्रमाची नोंद

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप १० फलंदाज..

बेन स्टोक्स - १०९ षटकार*

ब्रॅंडन मॅक्युलम- १०७ षटकार

ऍडम गिलख्रिस्ट -१०० षटकार

ख्रिस गेल -९८ षटकार

जॅक कॅलिस -९७ षटकार

वीरेंद्र सेहवाग-९१ षटकार

ब्रायन लारा -८८ षटकार

ख्रिस क्रेन्स -८७ षटकार

विव रिचर्ड्स-८४ षटकार

अँड्रयू फ्लिंटॉफ -८२ षटकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com