Ben Stokes: खेळताना नव्हे तर 'या' कारणामुळे बेन स्ट्रोक्सच्या चेहऱ्याला दुखापत, समोर आलं कारण

Ben Stokes facial injury: इंग्लंडचा टेस्ट टीमचा कर्णधार बेन स्टोक्स याला चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. ही दुखापत सामन्यात खेळताना नव्हे तर सराव सामन्यादरम्यान झाल्याचं समोर आलं आहे.
Ben Stokes facial injury
Ben Stokes facial injurysaam tv
Published On

उद्यापासून टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. दरम्यान या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. बेन स्टोक्सने सोशल मीडियावर त्याच्या दुखापतीचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्याला चांगलाच मार लागल्याचं दिसतंय. त्याला झालेल्या दुखापतीचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

इन्स्टावर शेअर केली स्टोरी

स्टोक्सने जखमी झालेल्या चेहऱ्यासह इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आणि मस्करीत त्याने लिहिलंय की, "तुम्ही क्रिकेट बॉलची स्थिती पाहिली पाहिजे." स्टोक्स इंग्लंडच्या व्हाईट-बॉल क्रिकेटमधून बाहेर आहे. त्यामुळे तो आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी इंग्लंड टीमचा भाग नाही. स्टोक्स २०२२ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून खेळला होता. २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी त्याला इंग्लंड टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नव्हतं.

Ben Stokes facial injury
IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

बेन स्टोक्सला नेमकी कशी झाली दुखापत?

समोर आलेल्या काही बातम्यांनुसार, स्टोक्सला दुखापत सामन्यादरम्यान नव्हे तर सराव करताना झाल्याचं समजतंय. या बातम्यांमध्ये असंही म्हटलंय की, स्टोक्स बाजूला उभा राहून बोलत होता. त्यावेळी अचानक चेंडू त्याच्या चेहऱ्यावर लागला. आपल्याकडे येत असलेला चेंडू त्याला दिसला नाही. त्यामुळे चेंडू थांबवणं त्याला शक्य झालं नाही.

अ‍ॅशेस सिरीजमध्येही झालेली दुखापत

इंग्लंडचा टेस्ट टीमचा कर्णधार बेन स्टोक्सलाही २०२५-२६ च्या अ‍ॅशेस सिरीज दरम्यान दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला पाठीचा त्रास झाला होता. स्टोक्स पाठीच्या दुखापतीतून बरा होत असतानाच चेहऱ्याच्या दुखापतीमुळे त्याच्या समस्या आणखी वाढल्या.

Ben Stokes facial injury
IND vs PAK: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड होणार बर्बाद! IND vs PAK सामना झाला नाही तर इतक्या कोटींचं होणार नुकसान

कसं आहे स्टोक्सचं करियर?

बेन स्टोक्सने १२० टेस्ट, ११४ वनडे आणि ४३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. यावेळी टेस्ट सामन्यात त्याने ७,२१६ रन्स केलेत आणि २४५ विकेट्स घेतल्या आहेत. वनडे सामन्यात त्याने ३,४६३ रन्स केले असून ७४ विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्टोक्सने ५८५ रन्स केलेत आणि २६ विकेट्स घेतल्या आहेत.

Ben Stokes facial injury
T20 WC: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासोबत खेळा नाहीतर...! ICC ने पाकिस्तानला दिली शेवटची वॉर्निंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com