Rohit Sharma Wicket: मालिकेतील पहिलाच बॉल टाकला अन् रोहितची विकेट काढली; बेन स्टोक्सच्या भन्नाट बॉलचा Video व्हायरल

India vs England 5th Test: धरमशालेच्या थंड वातावरणात रोहितने इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत सुरु आहे.
ben stokes clean bowled rohit sharma on his first delivery in india vs england test series watch video
ben stokes clean bowled rohit sharma on his first delivery in india vs england test series watch videotwitter

Ben Stokes Clean Bowled Rohit Sharma:

धरमशालेच्या थंड वातावरणात रोहितने इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. त्याने इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेत १०३ धावा चोपल्या. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने त्याच्या या शानदार खेळीला ब्रेक लावला.

कर्णधारानेच घेतली कर्णधाराची विकेट..

रोहितच्या आक्रमक फलंदाजीसमोर इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच गोंधळ उडाला. दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत रोहित खेळपट्टीवर टिकून होता. रोहितने १५४ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. दरम्यान १०३ धावांवर फलंदाजी करत असताना भारतीय संघाला दुसरा धक्का बसला. १०३ धावांवर फलंदाजी करत असताना बेन स्टोक्सने त्याला क्लीनबोल्ड करत माघारी धाडलं.

ben stokes clean bowled rohit sharma on his first delivery in india vs england test series watch video
IND vs ENG 5th Test: रोहित शर्मा- शुबमन गिलचा 'शतकी' तडाखा! इंग्लिश गोलंदाजांना चोपून काढलं

तर झालं असं की, लंच ब्रेकनंतर कर्णधार बेन स्टोक्स स्वत: गोलंदाजी करण्यासाठी आला. या संपूर्ण मालिकेत त्याने एकही चेंडू टाकला नव्हता. दरम्यान मालिकेतील पहिल्याच चेंडूवर त्याला मोठा मासा गळाला लागला आहे.

बेन स्टोक्स ६२ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने मिडल आणि ऑफ स्टम्पच्या मध्ये टाकला. हा चेंडू टप्पा पडताच इतका वळला की रोहितचा ऑफ स्टम्प उडवून गेला. रोहितच्या या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Cricket news in marathi)

रोहितची राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी..

रोहित या डावात १०३ धावा करत माघारी परतला. त्याने या खेळीदरम्यान १३ चौकार आणि ३ षटकार मारले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १२ वे शतक ठरले आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४८ वे शतक ठरले आहे. या खेळीसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत राहुल द्रविडच्या रेकॉर्डच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. राहुल द्रविडच्या नावे देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ शतकं झळकावण्याची नोंद आहे.

ben stokes clean bowled rohit sharma on his first delivery in india vs england test series watch video
Yashasvi Jaiswal Sixes: नॉर्मल वाटलोय का? 6,6,6; बशीरच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालचे बॅक टू बॅक 3 षटकार- Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com