Rohit Sharma Record: नाद करा पण हिटमॅनचा कुठं! ENG विरुद्ध शतक झळकावताच रोहितची राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी

India vs England 5th Test: इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या कसोटीत रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना धरमशालेच्या मैदानावर सुरु आहे.
ind vs eng rohit sharma equals the record rahul dravid of scoring most centuries in international cricket
ind vs eng rohit sharma equals the record rahul dravid of scoring most centuries in international cricket twitter
Published On

Rohit Sharma Equals The Record Of Rahul Dravid:

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या कसोटीत रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना धरमशालेच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय रोहित आणि शुभमन गिलने मिळून इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान रोहितचं हे शतक अतिशय खास ठरलं आहे.

इंग्लंडने केलेल्या २१८ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानावर आली. यशस्वी जयस्वाल अर्धशतकी खेळी करत माघारी परतला. त्यानंतर रोहित आणि गिलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. रोहितने १५४ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.

हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १२ वे शतक ठरले आहे. तसेच त्याच्या आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४८ वे शतक ठरले आहे. या खेळीसह त्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत हेड कोच राहुल द्रविडची बरोबरी केली आहे.

ind vs eng rohit sharma equals the record rahul dravid of scoring most centuries in international cricket
IND vs ENG 5th Test: रोहित शर्मा- शुबमन गिलचा 'शतकी' तडाखा! इंग्लिश गोलंदाजांना चोपून काढलं

राहुल द्रविडनेही आपल्या आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत ४८ शतकं झळकावली होती. या यादीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनच्या नावे १०० शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर विराट कोहलीने ८० शतकं झळकावली आहेत. (Cricket news in marathi)

ind vs eng rohit sharma equals the record rahul dravid of scoring most centuries in international cricket
Yashasvi Jaiswal Sixes: नॉर्मल वाटलोय का? 6,6,6; बशीरच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालचे बॅक टू बॅक 3 षटकार- Video

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज..

सचिन तेंडुलकर - १०० शतकं

विराट कोहली- ८० शतकं

रोहित शर्मा- ४८ शतकं*

राहुल द्रविड - ४८ शतकं

तसेच आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा जो रुटला मागे सोडत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. रोहितने ४८ शतकं झळकावली आहेत. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने ८० शतकं झळकावली आहेत. तर डेव्हिड वॉर्नरने ४९ शतकं झळकावली आहेत.

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज..

विराट कोहली - ८० शतकं

डेव्हिड वॉर्नर - ४९ शतकं

रोहित शर्मा - ४८ शतकं*

जो रुट - ४७ शतकं

केन विलियमसन- ४५ शतकं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com