IND vs ENG 5th Test: रोहित शर्मा- शुबमन गिलचा 'शतकी' तडाखा! इंग्लिश गोलंदाजांना चोपून काढलं

Rohit Sharma- Shubman Gill Century: धरमशालेतील HPCA च्या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे.
india vs england 5th test rohit sharma and shubman gill scored century cricket news in marathi
india vs england 5th test rohit sharma and shubman gill scored century cricket news in marathitwitter
Published On

India vs England 5th Test, Rohit- Gill Century:

धरमशालेतील HPCA च्या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. मालिकेतील सलग ३ सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर शेवटच्या सामन्यातही भारतीय खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला आहे.

गोलंदाजांनी इंग्लंडला गुडघे टेकायला भाग पाडल्यानंतर भारतीय फलंदाजांनी देखील इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवलं आहे. पहिल्या डावात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बॅक टू बॅक शतकं झळकावली आहेत.

गिल आणि रोहितची शानदार शतकं..

इंग्लंडने २१८ धावा केल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघेही मैदानावर आले होते. या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून १०४ धावांची भागीदारी केली. मात्र यशस्वी जयस्वाल ५७ धावा करत माघारी परतला.

यशस्वी जयस्वाल परतल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मिळून संघाचा गाडा पुढे नेला. दोघांनी मिळून शतकी भागादारी केली. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने १५४ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.

india vs england 5th test rohit sharma and shubman gill scored century cricket news in marathi
IND vs ENG: कॅप्टन असावा तर असा! लाईव्ह सामन्यात सरफराज अन् जयस्वालला रोहितने दिले फिल्डिंगचे धडे- Video

त्याने टॉम हार्टेलेच्या चेंडूवर १ धाव घेत हे शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार आणि ३ चौकार मारले. रोहितचं शतक पूर्ण झाल्यानंतर पुढच्या २ चेंडूंवर शुभमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं . गिलने १३७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ५ षटकार मारले. (Cricket news in marathi)

इंग्लंडचा डाव २१८ धावांवर संपुष्टात..

या सामन्यात बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना कुठल्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर आर अश्विनने ४ आणि रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला.

india vs england 5th test rohit sharma and shubman gill scored century cricket news in marathi
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटीत मालिकेत या ५ खेळाडूंनी केलं पदार्पण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com