भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पाचवा कसोटी सामना धरमशालेतील HPCA स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी कर्णधार रोहित शर्माने असं काही केलं जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लाईव्ह सामन्यात नेहमीच आपल्या मजेशीर वक्तव्यांमुळे चर्चेत येणारा रोहित यावेळी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रोहित शर्माचे क्षेत्ररक्षण करत असतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावेळीही त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. ज्यात तो यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खा्नला क्षेत्ररक्षणासाठी कुठे उभं राहायचं हे सांगताना दिसून येत आहे.
ही घटना भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना ४० व्या षटकात घडली. ज्यावेळी जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत होता त्यावेळी रोहितला गलीमध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं होतं. त्यावेळी त्याने इशारा न करता स्वतःच सरफराजला पकडलं आणि जिथे त्याला हवं आहे तिथे उभं केलं. (Cricket news in marathi)
सरफराजला गलीमध्ये उभं केल्यानंतर त्याने यशस्वीला एक निशाण बनवून दिलं आणि तिथेच उभं राहण्यासाठी सांगितलं. हे पाहून समलोचांकांनाही आपलं हसू आवरलं नाही. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मात्र त्याचा हा निर्णय फसला. करा इंग्लंडचा पहीला डाव अवघ्या २१८ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ५ तर आर अश्विनने ४ आणि रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघानेही दमदार सुरुवात केली. पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ १३५ धावांवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.