BCCI Prize Money: 1983,2007,2011आणि 2024, वर्ल्डकप विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले होते?

BCCI Prize Money For World Cup Winners: भारतीय संघातील खेळाडूंना बक्षीस म्हणून १२५ कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
BCCI Prize Money: 1983,2007,2011आणि 2024, वर्ल्डकप विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले होते?
team indiatwitter
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी-२० वर्ल्डकप जिंकला. २०१३ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघाला वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्यात यश आलं. त्यामुळे बीसीसीआयने वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघासाठी १२५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. ही बीसीसीआयकडून आत्तापर्यंत कुठल्याही संघाला दिली गेलेली सर्वात मोठी रक्कम आहे. यापूर्वी भारतीय संघाने १९८३, २००७ आणि २०११ मध्ये वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. त्यावेळी वर्ल्डकप विजेता संघाला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले होते? जाणून घ्या

१९८३ वर्ल्डकप

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. १९८३ मध्ये वेस्टइंडिजला पराभूत करत भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला होता. ज्यावेळी भारतीय संघाने संघाने वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी या खेळाडूंना देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते. त्यावेळी लता मंगेशकर यांनी एक चॅरिटी शो करून खेळाडूंसाठी पैसे जमा केले होते. त्यावेळी या खेळाडूंना प्रत्येकी १ रुपये दिले गेले होते.

BCCI Prize Money: 1983,2007,2011आणि 2024, वर्ल्डकप विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले होते?
IND vs ZIM: झिम्बाब्वेचा पराभव करत टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया,पाकिस्तानला मात; तोडला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रेकॉर्ड

२००७ टी -२० वर्ल्डकप

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत २००७ टी -२० वर्ल्डकप जिंकला होता. या विजयानंतर भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव करण्यात आला होता. वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूंना १० कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले गेले होते. यासह इंग्लंडविरुद्ध सलग ६ षटकार मारणाऱ्या युवराज सिंगला एक कोटी रुपये दिले गेले होते.

BCCI Prize Money: 1983,2007,2011आणि 2024, वर्ल्डकप विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले होते?
IND vs ZIM: 6,6,6,6,6..झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंगचा कहर! मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला सोडू शकतो मागे

२०११ वनडे वर्ल्डकप

१९८३ नंतर २०११ मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. यावेळी वर्ल्डकप एम एस धोनीच्या नेतृत्वात जिंकला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर धोनीने विनिंग षटकार मारत भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकून दिला होता. या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी ३९ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. दरम्यान प्रत्येक खेळाडूला बक्षीस म्हणून २ दोन कोटी रुपये दिले होते.

२०२४ टी -२० वर्ल्डकप

आता टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी १२५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com