

बांगलादेशचा तेजतर्रार गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएल फ्रेंचाइजी कोलकाता नाइट रायडर्सने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बीसीसीआयने केकेआरला तसे निर्देश दिले होते. यामुळे नाराज झालेल्या बांगलादेशनं मोठा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात मोठ्या आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणावर बांगलादेशनं अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. त्यामुळं बांगलादेशमधील आयपीएल स्पर्धेच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे, असे मानले जात आहे. कोलकाता संघानं गेल्या महिन्यात अबुधाबीमध्ये झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये मुस्तफिजूरला ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते.
बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ५ जानेवारीला सर्व वाहिन्यांना आयपीएलचं प्रसारण तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. मंत्रालयानं याबाबत एक अधिकृत पत्रक काढलं आणि त्याद्वारे सर्व वाहिन्यांना ते पाठवण्यात आले. बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमान याला आगामी आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स संघातून काढण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.
बीसीसीआयने हा निर्णय घेण्यामागे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. यामुळे बांगलादेशचे नागरिक खूप नाराज झाले आहेत. त्यांच्या मनात प्रचंड चीड आहे. या परिस्थितीला अनुसरून मंत्रालयाने सर्व वाहिन्यांच्या अधिकाऱ्यांना हा आदेश दिला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व आयपीएल सामने आणि संबंधित कार्यक्रमांचं प्रसारण तात्काळ थांबवण्यात यावे, असे या अधिकृत पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.