AUS vs NZ: न्यूझीलंडच्या विजयासाठी भारतीयांचे देव पाण्यात! ऑस्ट्रेलिया जिंकली, तर कसं असेल टीम इंडियासाठी समीकरण?

Team India Semi Final Scenario In ICC Womens T20 World Cup 2024: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण? समजून घ्या.
AUS vs NZ: न्यूझीलंडच्या विजयासाठी भारतीयांचे देव पाण्यात! ऑस्ट्रेलिया जिंकली, तर कसं असेल टीम इंडियासाठी समीकरण?
new zealand cricket team twitter
Published On

ICC Womens T20 World Cup 2024, AUS vs NZ: आयसीसी महिला टी-०२० वर्ल्डकप स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. याच ग्रुपमध्ये भारतीय संघ देखील आहे.

या दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला होता. हा सामना सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. यासह भारतीय संघांच्या दृष्टीने देखील हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

भारतीय संघाची पराभवाने सुरुवात

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. यापूर्वी झालेल्या १० सामन्यांमध्ये न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर भारतीय संघाला पराभूत करत न्यूझीलंडने आपल्या पराभवाची मालिका खंडीत केली.

त्यानंतर पुढील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. मात्र रन रेट -१.२१७ इतकाच राहिला. भारतीय संघाला जर सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर पुढील दोन्ही सामने कुठल्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत. यासह इतर संघांच्या कामगिरीवरह अवलंबून राहावं लागणार आहे.

AUS vs NZ: न्यूझीलंडच्या विजयासाठी भारतीयांचे देव पाण्यात! ऑस्ट्रेलिया जिंकली, तर कसं असेल टीम इंडियासाठी समीकरण?
IND vs BAN: सूर्याचा मास्टरप्लान! पहिल्या सामन्यात या दोघांना पदार्पणाची संधी; पाहा Playing XI

भारतीय संघ ग्रुप ए मध्ये चौथ्या स्थानी आहे. तर नेट रनरेट २.९०० असणारा न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी, १.९०८ नेट रनरेट असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आणि ०.५५५ नेट रनरेट असलेला पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानी, -१.६६७ नेट रनरेट असलेला श्रीलंकेचा संघ चौथ्या स्थानी आहे. तर भारती संघ सर्वात शेवटी आहे.

AUS vs NZ: न्यूझीलंडच्या विजयासाठी भारतीयांचे देव पाण्यात! ऑस्ट्रेलिया जिंकली, तर कसं असेल टीम इंडियासाठी समीकरण?
Team India: भारताच्या नवदुर्गा! टीम इंडियाच्या रणरागिणी उंचावणार T-20 WC ची ट्रॉफी

जर ऑस्ट्रेलिया जिंकली तर ..

आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवताच ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थान गाठणार आबे. इथून पुढे ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने एक जरी सामना जिंकला, तरीदेखील ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार असणार आहे. जर भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये जायचं असेल, तर पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत होणं गरजेचं आहे. तर पाकिस्तान किंवा श्रीलंकैपैकी एका संघाने न्यूझीलंडला पराभूत करणं गरजेच असणार आहे.

न्यूझीलंडचा संघ जिंकला तर...

आज होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला, तर भारतीय संघाचं टेन्शन कमी होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये जाण्याच मार्ग मोकळा होणार आहे. असं झाल्यास भारतीय संघाला इथून पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com