
एशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला दुबईत होणार आहे.
सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीत होणार आहेत.
एशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एशिया कप 2025 ला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान यांचा सामना 14 सप्टेंबरला होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.
आता एशियन क्रिकेट काऊंसिलने (ACC) वेळापत्रकासोबतच सामन्यांचं स्थळही निश्चित केलंय. या स्पर्धेतील सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीत (UAE) होणार असून अबू धाबी आणि दुबई ही प्रमुख ठिकाणं असणार आहेत. यूएईमध्ये एशिया कप घेण्याच्या चर्चांना आधीपासूनच वाव होता. मात्र ACC च्या अधिकृत घोषणेमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. 14 सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्याबाबतही बरीच उलटसुलट चर्चा सुरु होती. मात्र ACC ने आता या सामन्याचं स्थळ जाहीर केलंय. हा सामना दुबईमध्ये सायंकाळी 6 वाजता खेळवला जाणार आहे. भारत या स्पर्धेत आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला UAE टीमविरुद्ध दुबईमध्येच खेळणार आहे.
भारत, पाकिस्तान, यूएई, ओमान
श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग
दुबई इंटरनॅशनल स्टेडियम – एकूण 11 सामने (भारत-पाकिस्तान सामना आणि फायनलसह)
शेख झायेद स्टेडियम, अबूधाबी – एकूण 8 सामने
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग, अबूधाबी – सायं. 7:30
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई, दुबई – सायं. 7:30
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग, अबूधाबी – सायं. 7:30
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान, दुबई – सायं. 7:30
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, अबूधाबी – सायं. 7:30
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई – सायं. 7:30
15 सप्टेंबर
यूएई विरुद्ध ओमान, अबूधाबी – संध्या. 5:30
श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग, दुबई – सायं. 7:30
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई – सायं. 7:30
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई, अबूधाबी – सायं. 7:30
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई – सायं. 7:30
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान, अबूधाबी – सायं. 7:30
20 सप्टेंबर – ग्रुप बी क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2, दुबई – सायं. 7:30
21 सप्टेंबर – ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर 2, दुबई – सायं. 7:30
23 सप्टेंबर – ग्रुप ए Q1 विरुद्ध ग्रुप बी Q2, अबूधाबी – सायं. 7:30
24 सप्टेंबर – ग्रुप बी Q1 विरुद्ध ग्रुप ए Q2, दुबई – सायं. 7:30
25 सप्टेंबर – ग्रुप ए Q2 विरुद्ध ग्रुप बी Q2, दुबई – सायं. 7:30
26 सप्टेंबर – ग्रुप ए Q1 विरुद्ध ग्रुप बी Q1, दुबई – सायं. 7:30
28 सप्टेंबर – फायनल सामना, दुबई – सायं. 7:30
एशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याला वेगळ्याच कारणाने वादाचे गालबोट लागलंय. काही दिवसांपूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेत भारताच्या माजी दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये दोन गट पडले आहेत.
एकीकडे असं आहे की, भारताने एशिया कपमध्येही पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. तर दुसऱ्या बाजूला काही लोकांचा आग्रह आहे की, भारताने सामना खेळावा, कारण सामना न खेळल्यास आयसीसी क्रमवारीवर त्याचा विपरित परिणाम होईल. भारताच्या क्रमवारी घसरण्याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तान भारताच्या जागी क्वालिफाय होऊ शकतो.
एशिया कप 2025 ची सुरुवात केव्हा होणार आहे?
एशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोठे आणि केव्हा होणार आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे
एशिया कप 2025 मध्ये कोणते दोन स्टेडियम वापरले जाणार आहेत?
एशिया कप 2025 मध्ये दुबई इंटरनॅशनल स्टेडियम आणि शेख झायेद स्टेडियम (अबूधाबी) यांचा वापर केला जाणार आहे.
एशिया कप 2025 चा फायनल सामना केव्हा आणि कोठे होणार आहे?
एशिया कप 2025 चा फायनल सामना 28 सप्टेंबर 2025 रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याभोवती वाद का निर्माण झाला आहे?
काही भारतीय माजी खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला आहे. काहींच्या मते भारताने सामना खेळावा, नाहीतर आयसीसी क्रमवारीवर परिणाम होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.