India-Pakistan Cricket: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही? क्रीडा मंत्रालयानं स्पष्टचं सांगितलं

India-Pakistan Cricket: क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की भारत कोणत्याही खेळात पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, परंतु आम्ही भारतीय क्रिकेट संघाला आशिया कप २०२५ मध्ये सहभागी होण्यापासून रोखणार नाही.
India-Pakistan Cricket
Sports Ministry clarifies India-Pakistan cricket ties: No bilateral matches, Asia Cup participation allowedsaamtv
Published On
Summary
  • भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका होणार नाही.

  • भारतीय संघाला आशिया कप २०२५ मध्ये खेळण्यास परवानगी.

  • आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो.

  • दहशतवाद संपेपर्यंत भारत-पाकिस्तानचे द्विपक्षीय सामने बंद.

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षामुळे दोन्ही देशात तणाव आहे. दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला असताना आशिया कप टी-२०चे वेळापत्रक जाहीर झालं. यात भारत पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. पण भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घ्यावी, अशी चर्चा सुरू आहे. कारण दोन्ही देशातील संबंध चांगले नाहीत. जोपर्यंत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद नष्ट होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे खेळ किंवा पाकिस्तानशी कोणताही संबंध ठेवू नये, अशी भारतीयांची इच्छा आहे. याच दरम्यान क्रीडा मंत्रालयानं भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलीय.

India-Pakistan Cricket
Shreyas Iyer : श्रेयस अय्यर होणार टीम इंडियाचा कर्णधार? BCCI चा नवीन प्लॅन, वर्ल्ड कपआधी होणार घोषणा

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कोणताच प्रकारचे सामने होणार नाहीत. पण भारतीय क्रिकेट संघाला एशिया कपात खेळण्यापासून आम्ही रोखू शकत नाही असं क्रिडा मंत्रालयानं स्पष्ट केलंय. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कोणताच प्रकारचे सामने होणार नाहीत. पण भारतीय क्रिकेट संघाला एशिया कपात खेळण्यापासून आम्ही रोखू शकत नाही असं क्रिडा मंत्रालयानं स्पष्ट केलंय.

India-Pakistan Cricket
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला दुसरा धक्का; रहाणेच्या फीडबॅकने कर्णधारपदाचा गेम झाला

पीटीआयच्या वृत्तानुसार, क्रीडा मंत्रालयाच्या धोरणात म्हटले आहे की, "पाकिस्तानशी संबंधित क्रीडा स्पर्धांबाबत भारताचा दृष्टिकोन त्या देशासोबतच्या भारताच्या संबंधांमध्ये स्वीकारलेल्या व्यापक धोरणाचे प्रतिबिंबित करतो. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही.

पाकिस्तानी संघांना भारतात द्विपक्षीय सामने खेळण्याची परवानगीही दिली जाणार नाही, असं क्रीडा मंत्रालयाने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय खेळांबाबत म्हटलंय. पण मोठ्या स्पर्धा असतील किंवा टुर्नामेंट असतील तर त्यावर काही परिणाम होणार नाही. त्यात दोन्ही संघ भाग घेऊ शकतील. "आम्ही भारतीय क्रिकेट संघाला आशिया कपमध्ये खेळण्यापासून रोखणार नाही, कारण ही एक बहु-राष्ट्रीय स्पर्धा आहे." असं एका मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com