Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला दुसरा धक्का; रहाणेच्या फीडबॅकने कर्णधारपदाचा गेम झाला

Shardul Thakur Named Mumbai Ranji Captain : आशिया कप संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यरला आणखी एक धक्का बसलाय. अजिंक्य रहाणेच्या फिडबॅकनंतर मुंबईने शार्दुल ठाकूरला रणजी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Shardul Thakur Named Mumbai Ranji Captain
Shreyas Iyer suffers a double blow as Shardul Thakur replaces him as Mumbai Ranji captainsaam tv
Published On
Summary
  • आशिया कपसाठी भारतीय संघातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आलं.

  • अय्यरला मुंबई रणजी संघाचं नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा होती.

  • रहाणेच्या फीडबॅकनंतर अय्यरऐवजी शार्दुल ठाकूरला कॅप्टन बनवण्यात आलं.

  • इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार ही मोठी बातमी समोर आली

आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड काही दिवसापूर्वी करण्यात आली. मात्र या संघात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरचा समावेश नाहीये. त्याला या संघातून वगळण्यात आलायं. यानंतर श्रेयस अय्यर याला दुसरा मोठा धक्का बसलाय. यासाठी अजिंक्य रहाणेने दिलेला फिडबॅक कारणीभूत ठरलाय.

त्याचे झाले असे, अजिंक्य रहाणेने मुंबईची कॅप्टन्सी सोडल्यानंतर श्रेयस अय्यरला कर्णधार पदाची संधी मिळेल, असं वाटत होतं. रहाणेनंतर अय्यरकडे मुंबईच्या रणजी टीमचं नेतृत्व दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अय्यर ऐवजी शार्दुल ठाकूरकडे मुंबईच्या रणजी संघाची जबाबदारी देण्यात आलीय. शार्दुलला मुंबई रणजी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

Shardul Thakur Named Mumbai Ranji Captain
Asia Cup 2025: टीम इंडियातून श्रेयस अय्यरला डच्चू; चाहत्यांची तळपायाची आग मस्तकाला, निवडकर्त्यांना सुनावलं

अजिंक्य राहणेने कर्णधार पद सोडताना सोशल मीडियावर पोस्ट केली होती. नव्या नेतृत्वाला तयार करण्यासाठी मुंबईची कॅप्टन्सी सोडत असल्याचं रहाणने आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार मुंबई क्रिकेटच्या निवड समिती सदस्यांनी अजिंक्य रहाणेसोबत पुढच्या कॅप्टनबाबत चर्चा केली. तसेच त्यांनी त्याचा फीडबॅकही घेतला. अजिंक्य रहाणेने मागच्या रणजी ट्रॉफीच्या हंगामात १४ इनिंगमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ४६७ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने मागच्या काही वर्षात मुंबई क्रिकेटच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावलीय. मागच्या मोसमात शार्दुलने एका शतकाच्या मदतीने ५०५ धावा केल्या तसेच ९ सामन्यांमध्ये ३५ विकेटही घेतल्या.

Shardul Thakur Named Mumbai Ranji Captain
इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

रहाणेची पोस्ट काय?

'मुंबईचं नेतृत्व करण्याचा आणि चॅम्पियनशीप जिंकण्याचा अभिमान आहे. नवा हंगाम सुरू होत आहे, त्यामुळे नव्या नेतृत्वाला तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं वाटतं, त्यामुळे मी मुंबईची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतलाय, पण मी खेळाडू म्हणून मुंबई क्रिकेटला आणखी ट्रॉफी जिंकवण्यासाठी सर्वकाही देईन. येणाऱ्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे', अशी पोस्ट रहाणेने केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com