

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी२० सामन्यांची सिरीज आजासून सुरू झाली आहे. कॅनबरामधील मानुका ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसन, हर्षित राणा, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.
वनडे सिरीजमध्ये हर्षित राणाने चांगली कामगिरी केली होती. वनडे नंतर हर्षितला टी-२० सिरीजमध्ये स्थान देणार का हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र पहिल्याच टी-२० सामन्यामध्ये हर्षितचा प्लेईंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. यावेळी अर्शदीप सिंगला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
ही सिरीज २०२६ च्या सुरुवातीला होणाऱ्या टी२० वर्ल्डकपच्या तयारीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जातेय. भारताला वर्ल्डकपपूर्वी एकूण १५ टी२० सामने खेळायचे आहेत. एशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियात ही मोठी सिरीज जिंकण्याच्या उद्देशाने उतरलीये .
भारताने २००८ साली प्रथमच ऑस्ट्रेलियात टी२० सिरीज खेळली होती. तेव्हा केवळ एकच सामना झाला होता आणि तो ऑस्ट्रेलियाने १-० ने जिंकला होता. त्यानंतर एकदा दोन सामन्यांची आणि तीन वेळा तीन सामन्यांची सिरीज झाली. या चारपैकी दोन मालिका भारताने जिंकल्या होत्या.
आतापर्यंत झालेल्या ३२ टी२० सामन्यांपैकी भारताने २० सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने ११ विजय मिळवला आहे. यामध्ये एक सामना अनिर्णित राहिला होता.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मिचेल मार्श (कर्णधर), ट्रेविस हेड, जोश इंग्लिश (विकेट कीपर), टिम डेविड, मिच ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, जेवियर बार्टलेट, नाथन एलिस, मॅथ्यू कुहनमॅन, जोश हेजलवुड
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.