Chief Selector Of BCCI: वर्ल्ड कपचा संघ निवडण्याचा मान मुंबईकराला मिळणार; लवकरच होऊ शकते घोषणा

New Chief Selector Of BCCI: बीसीसीआयचे चिफ सिलेक्टर हे पद फेब्रुवारीपासुन रिकामे आहे
team india
team indiasaam tv
Published On: 

Ajit Agarkar: माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकरला चिफ सिलेक्टरची भूमिका दिली जाऊ शकते. बीसीसीआयचे चिफ सिलेक्टर हे पद फेब्रुवारीपासुन रिकामे आहे. ही जागा भरून काढण्यासाठी अजित आगरकरला प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

सध्या शिव सुदंर दास हे कार्यवाहक चिफ सिलेक्टरची भूमिका बजावत आहे. मात्र बीसीसीआय लवकरच नव्या चिफ सिलेक्टरची नियुक्ती करणार आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा रंगली होती की, वीरेंद्र सेहवाग या पदावर येऊ शकतो. मात्र या सर्व अफवा असल्याचं त्याने स्वतःहून स्पष्ट केलं आहे.

team india
ODI WC 2023: पाकिस्तानला भारतात यावच लागेल! नकार देणाऱ्या PCB ची ICC ने मोजक्या शब्दात चांगलीच जिरवली

चिफ सिलेक्टरच्या शर्यतीत अजित आगरकर सर्वात पुढे...

माध्यमातून वृत्तानुसार, अजित आगरकर हा चिफ सिलेक्टरच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र अजित आगरकर पुढील चिफ सिलेक्टर होणार हे जवळ जवळ स्पष्ट आहे. अजित आगरकरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, या गोलंदाजाने २६ कसोटी, १९१ वनडे आणि ४ टी -२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर आयपीएलचे ४२ सामने खेळले आहेत. (Latest sports updates)

team india
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

अजित आगरकरने २६ कसोटी सामने खेळताना ५९ गडी बाद केले आहेत. तर १९१ वनडे सामने खेळताना २८८ गडी बाद केले आहेत. यासह ४ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना त्याने ३ गडी बाद केले आहेत. तर आयपीएल स्पर्धेत त्याने ४२ सामने खेळताना २९ फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये देखील त्याने भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १६.७९ च्या सरासरीने ५७१ धावा केल्या आहेत. तर १९१ वनडे सामन्यांमध्ये १४.५९ च्या सरासरीने १२६९ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.