World Cup Records: रेकॉर्ड बनवले जातील अन् मोडले जातील! पण वर्ल्डकप स्पर्धेतील हे ५ रेकॉर्ड मोडणं अशक्यच

World Cup Records: वर्ल्डकप स्पर्धेतील हे ५ रेकॉर्ड मोडणं कठीण नव्हे तर जवळजवळ अशक्य आहे.य
World cup 2023
World cup 2023Saam tv
Published On: 

Unbreakable Records In World Cup:

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिल्यांदाच या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन भारतात केलं जाणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत मोठ मोठे रेकॉर्ड मोडले जातील. मात्र काही असे रेकॉर्ड आहेत जे यावेळी ही मोडले जाणं कठीण आहे.

World cup 2023
Asian Games 2023: गोल्फमध्ये आदितीची रौप्यक्रांती! गोल्डमेडल हुकलं मात्र सिल्व्हर मेडल जिंकत घडवला इतिहास

सचिन तेंडुलकरच्या ६७३ धावा..

भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे वर्ल्डकपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने २००३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या होत्या. हा रेकॉर्ड मोडणं कुठल्याही फलंदाजासाठी सोपं नसणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स..

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या नावे आहे. ग्लेन मॅकग्राने या स्पर्धेत ७१ गडी बाद केले आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ४९ गडी बाद करण्यासह पाचव्या स्थानी आहे. यावेळी मिचेल स्टार्कला जर हा रेकॉर्ड मोडायचा असेल तर २२ विकेट्स घ्याव्या लागतील. (Latest sports updates)

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सामने..

वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावे आहे. त्याने या स्पर्धेत एकूण ४६ सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याचा हा रेकॉर्ड मोडणं कठीण नव्हे तर अशक्य आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार..

वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावे आहे. ख्रिस गेलने या स्पर्धेत एकूण ४९ षटकार मारले आहेत. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने या स्पर्धेत एकूण २३ षटकार मारले आहेत. (Latest sports updates)

World cup 2023
World Cup 2023: ऑस्ट्रेलिया संघाला कोणत्या भारतीय फलंदाजाची भीती वाटते? लाबुशेनने सांगितलं नाव

सर्वात संथ खेळी..

हा रेकॉर्ड तोडण्याचा विचार कुठलाच फलंदाज करू शकत नाही. भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी १९७५ वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात १७४ चेंडूंचा सामना करून ३६ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.