Actress Mamta Kulkarni Became Mahamandaleshwar: जाणून घ्या महामंडलेश्वर होण्याची पात्रता आणि प्रक्रिया

How to Became Mahamandaleshwar: प्रयागराजच्या महाकुंभात बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेतलाय. आता त्या महामंडलेश्वर बनल्या आहेत. महामंडलेश्वर बनण्याची काय असते पात्रता हे जाणून घेऊ.
Mahamandaleshwar
How to Became MahamandaleshwarSaam Tv
Published On

नवदचं दशक, बॉलिवूडच्या सिनेमांनी दर्शनांना अक्षरशः वेडं लावलं होतं. या काळात ममता कुलकर्णीने तरुणांच्या दिलची धकधक वाढवली होती. ममता कुलकर्णीनं अख्य बॉलिवूडचं मार्केट जाम केलं होतं. 'राणाजी माफ करना, गुप चूप चूप, मांग मेरी भरो, सारखे गाणे प्रेक्षकांच्या तोंडी बसले होते. या गाण्यात अभिनेत्री ममता कुलकर्णींनी डान्स करत अनेकांना आपल्या अदांनी घायाळ केलं होतं. त्या अनेकांच्या गळ्यातील ताईत बनल्या होत्या, अशा अभिनेत्रीने आता संन्सास घेतलाय.

महाकुंभ दरम्यान किन्नर आखाड्यातून त्यांनी दीक्षा घेतलीय. आता ती आता महामंडलेश्वर झाल्या आहेत. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण आणि स्वामी जय अंबानंद गिरी यांच्या उपस्थितीत ममता कुलकर्णी ह्या महामंडलेश्वर बनल्या आहेत. आता सर्वांच्य मनात हाच प्रश्न पडलं असे महामंडलेश्वर होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे. तसेच महामंडलेश्वर होण्याची प्रक्रिया काय असते ते जाणून घेऊ.

Mahamandaleshwar
Kumbh Mela Naga Sadhu: नागा साधूंच्या जटांचं काय असतं रहस्य, का नाही कापत केस? जाणून घ्या कारण

सनातन धर्मात संन्यास घेण्याची परंपरा वर्षांनुवर्षांपासून चालू आहे. सनातन धर्मात वेगवेगळे साधू संत असतात. सनातन धर्मामध्ये सर्वात मोठे महंत शंकराचार्यंना मानलं जातं. शंकराचार्यांनंतर महामंडलेश्वर यांना स्थान असतं. महामंडलेश्वरचं पद हे साधू संतांच्या १३ आखाड्यात असतं. आखाड्यांमध्ये महामंडलेश्वरचं पद सर्वात मोठं पद असतं. शंकराचार्यांनंतर महामंडलेश्वर श्रेष्ठ मानले जातात.

Mahamandaleshwar
Mamta kulkarni : ममता कुलकर्णींच्या 'त्या' फोटोशूटमुळे सिनेसृष्टीत उडाली होती खळबळ; ब्लॅकमध्ये झाली होती मॅगझिनची विक्री

महामंडलेश्वर होण्याची प्रक्रिया काय आहे?

सर्वप्रथम महामंडलेश्वर पदासाठी सांधू-संताची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर त्यांना संन्यासाची दीक्षा दिली जाते. येथे संन्यास घेण्याचा अर्थ असा आहे की, ज्यात ज्या व्यक्तीची महामंडलेश्वरसाठी निवड करण्यात आलीय. त्यांचं त्यांच्य्याच हाताने पिंडदान केलं जातं. यात त्यांच्या पितरांचा देखील समावेश असतो. यानंतर त्यांची शेंडी ठेवली जाते.

ही शेंडी आखाड्यात काढली जाते. त्यानंतर त्यांना दीक्षा दिली जाते. यानंतर महामंडलेश्वरचं पट्टाभिषेक केलं जातं. पट्टाभिषेक पूजा मोठ्या विधीपूर्वक केली जाते. महामंडलेश्वरांचा पट्टाभिषेक दूध, तूप, मध, दही आणि साखरेपासून बनवलेल्या पंचामृताने केला जातो. सर्व १३ आखाड्यांचे संत महामंडलेश्वरांना पट्टा घालत असतात.

Mahamandaleshwar
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी यांनी घेतला संन्यास, नावही बदलले; महाकुंभमेळ्यात केली अध्यात्मिक जीवनाची सुरुवात

काय असते योग्यता

महामंडलेश्वर होण्यासाठी शास्त्री, आचार्य होणं आवश्यक असतं. ज्यांची महामंडलेश्वरसाठी निवड होणार असते त्यांच्याकडे वेदाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. महामंडलेश्वर होण्यासाठी कोणत्या एका मठाशी सबंध असणं आवश्यक आहे. ज्या मठातून महामंडलेश्वर होणार असतात त्या मठात जनकल्याण काम झाले पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com