Mamta kulkarni : ममता कुलकर्णींच्या 'त्या' फोटोशूटमुळे सिनेसृष्टीत उडाली होती खळबळ; ब्लॅकमध्ये झाली होती मॅगझिनची विक्री

Bollywood Actress Mamta Kulkarni : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत. त्यांच्या गत आयुष्यात त्या कायम चर्चेत राहिल्या आहेत. बॉलीवूडच्या अनेक हिट चित्रपटात त्यांनी काम केलं.
Mamata Kulkarni
Mamata KulkarniSaamtv
Published On

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत. प्रयागराजमधील संगम तटावर शुक्रवारी त्यांनी पिंडदान केलं. आता त्यांना यापुढे यमाई ममता नंदगिरी असं संबोधलं जाईल. त्यांचा पट्टाभिषेक होण्याचा बाकी आहे. साध्वी म्हणून ममता महाकुंभाला उपस्थित राहिल्या. त्यांनी भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्ष त्यांनी घातलेल्या होत्या. त्यांच्या खांद्यावर एक भगवी झोळीही लटकत असलेली दिसली.

अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी १९९१ मध्ये 'नानबरगल' या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. अभिनेत्री असताना ममता यांनी आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. 'मेरा दिल तेरे लिए' हा १९९१मध्ये आलेला त्यांचा पहिला हिन्दी चित्रपट होता. ममता यांना १९९३मध्ये आलेल्या 'आशिक आवारा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणातील अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

Mamata Kulkarni
Mumbai Mantralaya : मंत्रालयात झाडावर चढून तरुणाचं आंदोलन | Video

वक्त हमारा है', 'क्रांतीवीर', 'करण अर्जुन', 'बाजी' यासारख्या चित्रपटात देखील त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर १९९२मध्ये 'तिरंगा' या चित्रपटातून ममता यांना बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. 'वक्त हमारा है', 'सबसे बडा खिलाडी' अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अनिल कपूर यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत ममता यांनी स्क्रीन शेअर केलेली आहे.

Mamata Kulkarni
Top 10 Headlines @ 6 PM : लालपरीचा प्रवास महागला, रिक्षा टॅक्सीची ३ रुपयांची दरवाढ, गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे ६७ रुग्ण... वाचा ६ वाजताच्या टॉप हेडलाइन्स

खासगी आयुष्यात कायम चर्चेत राहिल्या ममता

साध्वी बनलेल्या ममता यांचं खासगी आयुष्य देखील त्यांच्या चित्रपटांसारखंच कायम चर्चेत राहिलं आहे. दुबईस्थित अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विक्की गोस्वामी याच्याशी ममता कुलकर्णी यांनी लग्न केलं असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर झाला. मात्र या केवळ अफवा असल्याचं ममता यांनी कायम सांगितलं. मी कधीही कोणाशीही लग्न केले नाही, असंच त्यांनी नेहेमी सांगितलं.

दरम्यान, १९९३ मध्ये स्टारडस्ट या मासिकासाठी ममता यांनी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. त्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या. त्यावेळी या मासिकाची ब्लॅकमध्ये मोठ्याप्रमाणात विक्री देखील झाली होती. त्याच वेळी 'चायना गेट' चित्रपटात दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी ममता यांना मुख्य अभिनेत्री म्हणून घेतले होते. सुरुवातीच्या मतभेदांनंतर, संतोषी ममताला चित्रपटातून काढून टाकायच्या विचारात होती.

मात्र त्यावेळच्या काही सूत्रांच्या माहितीनुसार अंडरवर्ल्डचा दबाव वाढल्यानंतर ममता यांना या चित्रपटात कास्ट करण्यात आले. ममता यांनी २०१३ मध्ये त्यांचे 'ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिनी' हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

Mamata Kulkarni
Saubhagyavati Sarpanch: दोन महिला सरपंचांची जुगलबंदी; प्रजासत्ताक दिनानिमित्ताने 'सौभाग्यवती सरपंच' वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com