Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताय? मग लक्षात ठेवा 'हे' ७ नियम

Ganesh Chaturthi Puja rule: पुढच्या आठवड्यात गणेश चतुर्थी आहे. या काळात लोक त्यांच्या घरी बाप्पाची मूर्ती बसवतात आणि गणरायाची मनोभावे पुजा करतात. जर तुम्हीही घरी गणपती बाप्पाची मूर्ती बसवणार असाल तर काही नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Ganesh Chaturthi Puja rule
Ganesh Chaturthisaam tv
Published On
Summary
  • गणेश चतुर्थीला मूर्ती घरात बसवताना ७ महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक.

  • मूर्ती ईशान्य कोपऱ्यात किंवा पूजाघरात ठेवावी.

  • पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तीला प्राधान्य द्यावे.

  • शुभ मुहूर्तात मूर्ती बसवून योग्य पद्धतीने विसर्जन करावे.

गेल्या काही वर्षांपासून गणेश चतुर्थीचा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसेच हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजा केली जाते असे मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. गणेशोत्सव १० दिवस साजरा केला जातो. यावर्षी २७ सप्टेंबर रोजी लोक त्यांच्या घरी गणपतीची मूर्ती स्थापना करतील. मूर्तीचे विसर्जन ६ सप्टेंबर रोजी होईल.

जर तुम्हीही या वर्षी तुमच्या घरी बाप्पाची मूर्ती स्थापित करणार असाल तर काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात फक्त मातीची मूर्तीच स्थापित करावी. मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती खूप शुभ मानली जाते तसेच ही मूर्ती पर्यावरणाचे रक्षण देखील करते.

Ganesh Chaturthi Puja rule
Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

गणरायाची मूर्ती घेताना एका गोष्ट लक्षात ठेवा गणरायाची सोंड उजव्या बाजुला असली पाहिजे.

जेव्हा तुम्ही बाजारातून मूर्ती आणता तेव्हा वाटेत गणेशजींचा चेहरा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा.

घराच्या सर्वात शुभ दिशेला बाप्पाची मूर्ती ठेवा. घराचा ईशान्य कोपरा सर्वात शुभ असतो.

गणपतीची मूर्ती फक्त याच दिशेला स्थापित करावी. पण जर घरात ही दिशा रिकामी नसेल तर तुम्ही ईशान्य दिशेलाही मूर्ती स्थापित करू शकता.

Ganesh Chaturthi Puja rule
Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

घरात गणेशाची स्थापना केल्यानंतर, एक किंवा दुसरा सदस्य नेहमीच त्यांची सेवा करण्यासाठी उपस्थित असलं पाहिजे.

प्रतिष्ठापना केल्यानंतर, घरात सकाळी आणि संध्याकाळी आरती करा.

गणपतीची मूर्ती स्थापित करण्यासोबतच नारळ असलेला कलश देखील स्थापित करा.

गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करत असाल तर घरात दहा दिवस सात्विक जेवण बनवलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com