Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीला चुकूनही करू नका 'ही' कामं; जाणून घ्या १० दिवसांचे नियम

Ganesh Chaturthi 2024: गणपतीची स्थापना करताना तसंच त्याची पुजा करताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. यावेळी गणपतीची योग्य दिशा आणि मुहूर्त यांचे नियम असतात.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024saam tv
Published On

पुढच्या महिन्यात गणेश चतुर्थी आहे. ७ सप्टेंबरपासून अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. गणपतीची स्थापना करताना तसंच त्याची पुजा करताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. दरम्यान गणपतीची स्थापना केल्यानंतर १० दिवस त्याच्या पुजेचे काय नियम आहेत, ते पाहूयात.

शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरच बाप्पाची स्थापना केली पाहिजे. याशिवाय दुपारची वेळ पूजेसाठी उत्तम मानली जाते. त्यामुळे प्रतिष्ठापना झाल्यावर मूर्ती इकडे तिकडे हलवू नये.

योग्य दिशा

गणपतीची मूर्ती पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यातच बसवणं गरजेचं आहे. असं केल्याने बाप्पाचा 10 दिवस घरात वास राहतो, असं मानलं जातं.

घरात बाप्पा स्थापनेचे नियम

जर तुम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करत असाल तर दररोज सकाळ संध्याकाळ त्यांना नैवेद्य अर्पण करा. याशिवाय संपूर्ण 10 दिवस आरती करा. त्याचप्रमाणे मूर्तीजवळ अंधार होणार नाही याची काळजी घ्या.

पूजेचं साहित्य

गणपतीला सिंदूर, दुर्वा आणि मोदक अर्पण करावेत. एक लक्षात ठेवा की, बाप्पाच्या पूजेत तुळस वापरू नये. पूजेमध्ये शिळी किंवा सुकलेली फुले टाकू नयेत.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Utsav : सावधान! POP ची मूर्ती स्थापन केल्यास होणार कारवाई, मंडळाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना बसणार दणका; न्यायालयाचे आदेश

पुजेची वस्त्र

गणेशपुत्र गौरीचा आवडता रंग लाल आणि पिवळे आहे. त्यामुळे शक्यतो या रंगांचे कपडे परिधान करून पूजा करा. चुकूनही तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. असं केल्यास 10 दिवसांची उपासना व्यर्थ होण्याचा धोका असतो.

चुकूनही १० दिवस 'या' गोष्टी करू नका

गणेश उत्सवात मांसाहार आणि मद्यपान करू नये. गणेश चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य पाळावं. या काळात कोणालाही शिवीगाळ करू नका तसंच इतर कोणाशी वाद घालू नका.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh idol Tips : बुद्धीची देवता गणेशाची मूर्ती घरी कशी आणायची?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com